अमेरिकेने इंग्लंडमधील एअरबेसवरून हटवले बॉम्बर

    दिनांक :05-Oct-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
US withdraws bomber अमेरिकन एअर फोर्सने इंग्लंडमधील त्या मिलिट्री एअर बेसवरून आपले बॉम्बर विमान परत बोलावून घेतले आहेत, ज्यांचा वापर इराणवर हल्ल्यांसाठी केला जात होता. आरएएफ फेअरफोर्ड बेसवर एका संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पेंटागनच्या एका अधिकाऱ्यानुसार, हे बॉम्बर अमेरिकेतील त्यांच्या बेसवर परत पाठवण्यात आले आहेत. संवेदनशील लष्करी हालचालींवर बोलण्यासाठी अधिकृत नसल्यामुळे या अधिकाऱ्याने रविवारी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली.
 
bomber
 
 
मिलिट्री एअर ट्रॅकिंग अलायन्ससारख्या विमान वाहतुकीवर लक्ष ठेवणाऱ्या समूहांनी इराण युद्धाच्या सुरुवातीपासूनच आरएएफ फेअरफोर्ड येथून डझनभर बी-५२ आणि बी-१ बॉम्बर ऑपरेट होत असल्याचे पाहिले आहे. तज्ज्ञांनी रविवारी बेसवरून अनेक बी-१ बॉम्बर उड्डाण करताना पाहिले. हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे जेव्हा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्धच्या युद्धासाठीच्या पर्यायांवर विचार करत आहेत, ज्यामध्ये नवीन हल्ल्यांचाही समावेश आहे. मात्र, ही मोहीम काही आठवडेच चालेल, असे आश्वासन त्यांनी सुरुवातीला अमेरिकन नागरिकांना दिले होते. शनिवारी ट्रम्प म्हणाले की, इराणबाबत मला काही निर्णय घ्यायचे आहेत. इराणला वाईटरित्या उद्ध्वस्त करण्यात आले आहे, त्यामुळे आता प्रश्न फक्त इतकाच आहे की, हा सोपा मार्ग असेल किंवा कठीण मार्ग असेल.
 
 
सप्टेंबरच्या शेवटी आरएएफ फेअरफोर्ड येथे घडलेल्या सुरक्षा घटनेनंतर, गेल्या आठवड्यात सेंट्रल लंडनमध्ये एका ब्रिटीश-इरॅनियन नागरिकाला दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली. या तपासणी दरम्यान एकूण सहा लोकांना ताब्यात घेण्यात आले आणि नंतर जामिनावर सोण्यात आले. ब्रिटीश अधिकाऱ्यांनी या घटनेचा संबंध तेहरानशी जोडला आहे. तथापि, इराणने यात सहभाग असल्याचा इन्कार केला आहे, परंतु आपल्या भागावर हल्ल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही बेसला योग्य लक्ष्य मानले जाईल, असे इराणने यापूर्वी म्हटले आहे.