‘ऑक्टोबर हिट’ने चंद्रपूरकर त्रस्त!

    दिनांक :06-Oct-2026
Total Views |
चंद्रपूर
chandrapur october-heat तीव्र उष्णतेसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर शहरात यंदाचा ऑक्टोबर चांगलाच तापणार असल्याचे दिसते. कारण यंदा हवा तसा पाऊस झाला नाही. परतीच्या पाऊसही रूसून गेला. त्यामुळे शहरात तापमानाचा पुन्हा पारा झपाट्याने वाढू लागला आहे. चंद्रपूर आणि विदर्भातील इतर भागांमध्ये कमाल तापमान 35 ते 37 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. इतकेच नाही, तर पुढचे पंधरा दिवस या तापमानात आणखी वाढ होऊन ते 40 अंश सेल्सिअसपर्ंयत पोहचेल, असा अंदाजही व्यक्त होत आहे.
 
oct hit
यंदा एकूणच पाऊस कमी झाल्याने पावसाळ्यातही उन्हाच्या तीव्र झळा जाणवल्या. तसेच ऑक्टोबर सुरू होताच शहर पुन्हा उन्हाळ्यासारखे तापू लागले आहे. दिवसभर तीव्र उष्णता, उकाळा आणि मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत वातावरणात हलका गारवा असल्याने त्याचे आरोग्यावरही परिणाम होत आहे. उष्ण आणि कोरड्या वातावरणामुळे नागरिकांना घश्याचे आजार बळावले आहे. 2009 नंतर यंदा इतक्या कमी प्रमाणात 400 ते 450 मिमी पावसाची नोंद झाल्याने शहरात फेब्रुवारीपासूनच पाण्याच्या समस्या जाणवू लागतील. तसेच यंदा शहर अधिकच तापेल, असे हवामान तज्ञांचे मत आहे.
पुढचे पंधरा दिवस धोक्याचे : सुरेश चोपणे
चंंद्रपूरचे तापमान ऑक्टोबरमध्ये 32 अंश ते 33 अंश सेल्सिअस असते. यंदा मात्र, कमाल तापमानच 36 अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. येत्या दोन ते तीन दिवसात ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. चंद्रपूरच्या प्रदुषणातही वाढ झाली आहे. परिणामी आरोग्याच्या समस्या उद्भवणार. पुढचे पंधरा दिवस तरी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत हवामान अभ्यासक सुरेश चोपणे यांनी व्यक्त केले.