९१ हजार ४४८ हेक्टर पंचनामे पूर्ण

कारंजातही पंचनामे सुरू

    दिनांक :06-Oct-2026
Total Views |
वर्धा
damage-assessment जिल्ह्यातील कारंजा वगळता उर्वरित ७ तालुक्यांचा दुष्काळाच्या ट्रिगर-१ मध्ये समावेश करण्यात आला आहे. तर सध्या शासनाच्या सूचनांनुसार जिल्ह्यात संयुक्त पंचनामे केले जात आहे. दुष्काळाच्या ट्रिगर-१ मध्ये समावेश असलेल्या वर्धा जिल्ह्यातील ७ तालुक्यांतील ९१४४८.३८हेक्टर क्षेत्राचे संयुक्त पंचनामे आतापर्यंत पूर्ण झाले असून दुष्काळाच्या ट्रिगर-१ च्या यादीत नसलेल्या कारंजा तालुक्यांतील ५२२३ हेक्टरचे पंचनामे आतापर्यंत पूर्ण करण्यात आले आहे.
 
damage assessment
आ. सुमीत वानखेडे यांच्या पाठपुराव्यामुळे कारंजा तालुक्यांत सर्व्हेक्षण होत पंचमाने करण्यास सुरूवात झाली आहे. पाण्या अभावी शेती करपण्यास सुरूवातही झाली आहे. शिवाय यंदा उत्पादनात घट होण्याची शयता कृषी विभागाकडून व्यत करण्यात आली आहे. पीक नुकसानीचे सर्वेक्षण करून संयुक्त पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला मिळाल्यावर महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाची यंत्रणेने युद्धपातळीवर संयुत पंचनामे करीत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सात तालुयांमध्ये ५६ हजार ८३१ शेतकर्‍यांच्या ९१ हजार ४४८.३८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे सर्वेक्षण करून पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे.
तालुकानिहाय पंचनामे
वर्धा : ७६८३
सेलू : १०२८६
देवळी : ७४४४
आर्वी : ९६२१
आष्टी : ६८४५
हिंगणघाट : ४७४६
समुद्रपूर : १०२०६
कारंजा : ३४१२