नवी दिल्ली
central-government-employees केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय कर्मचारी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीमध्ये वाढ होण्याची वाट पाहत आहेत. यावर्षी केंद्रीय कर्मचाèयांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारने जर तीन टक्क्यांना मंजुरी दिली तर महागाई भत्ता 60 टक्क्यांवरून 63 टक्क्यांवर पोहोचेल. महागाई भत्त्याची ही वाढ 1 जुलै 2016 पासून लागू होईल. पण, सरकारने याबाबत अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही.
जुलै 2026 च्या महागाई भत्त्याचे कॅल्क्यूलेशन जानेवारी ते जून 2026पर्यंतच्या सीपीआय आयव्ही म्हणजे इंडस्ट्रीयल वर्कर्ससाठी कंझ्युमर प्राइस इंडेक्सच्या आकडेवारीवर आधारित आहे. जून 2026 चा सीपीआय आयव्ही 15.19 होता. या आकडेवारीनुसार, महागाई भत्ता जवळपास 63.75 टक्के होतो. पण नियमानुसार कर्मचाèयांना 63 टक्के महागाई भत्ता मिळण्याची अपेक्षा आहे. अशामध्ये केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना तीन टक्क्यांचा फायदा होऊ शकतो.
महागाई भत्ता वाढला तर केंद्रीय कर्मचाèयांच्या पगारात देखील वाढ होते. जर एखाद्या कर्मचाèयाचा मूळ पगार 50 हजार आहे, तर त्याला 60 टक्के दराने 30 हजार रुपये महागाई भत्ता मिळतो. जर 63 टक्के महागाई भत्ता मिळाला तर ही रक्कम 31,500 रुपये होईल. म्हणजेच त्यांना दरमहा महागाई भत्त्यात 1500 रुपये जास्त मिळतील.