वर्धा
vehicle-overturns भरधाव मालवाहूच्या समोर अचानक श्वान आल्याने चालकाने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. अशात वाहनावरील नियंत्रण सुटत वाहन दुभाजकावर चढून उलटले. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात वर्धा-मांडगाव मार्गावरील करंजी शिवारात ६ रोजी सकाळी झाला. एजाज खान हमीद खान (२८) रा. भारतनगर अकोला असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एम. एच. ०१ सी. आर. ५६९७ क्रमांकाच्या मालवाहूने शेतीविषयक औषध अकोला येथून आरमोरीच्या दिशेने नेली जात होती. वाहन एजान खान हमीद खान हा चालवत होता. भरधाव वाहन वर्धा-मांडगाव मार्गावरील करंजी शिवारात आले असता अचानक वाहनासमोर दोन ते तीन श्वान आले. चालकाने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्ता दुभाजकावर चढत उलटले. यात चालक एजाज खान हमीद खान याचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद सेवाग्राम पोलिसांनी घेतली आहे.