घटस्फोटाआधीच पतीने केले दुसरे लग्न; पत्नीचा छळ

मुलाच्या पालनपोषणाचा खर्चही बंद ; एमआयडीसी ठाण्यात गुन्हा

    दिनांक :06-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे


नागपूर
divorce घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झालेली नसतानाही पतीने दुसरे लग्न केल्याचा तसेच पहिल्या पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आला आहे. याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
 
 
husband allegedly remarries before divorce, wife files case in nagpur
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआरपीएफ ग्रुप क्रमांक ४ येथील क्वार्टर क्रमांक ८८/४ मध्ये राहणाऱ्या रेणू सुधीर उपाध्याय (३४) यांचा वर्ष २०१० मध्ये सुधीर तेजबहादूर उपाध्याय (४२) यांच्याशी हिंदू रीतिरिवाजानुसार विवाह झाला होता. या दाम्पत्याला ओम हा १४ वर्षांचा मुलगा आहे. रेणू यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, वर्ष २०२२ पासून सुधीर हा सिमरन नामक महिलेसोबत राहत होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर रेणू यांनी पतीकडे विचारणा केली असता, सुधीरने घटस्फोट घेण्याची भाषा करीत त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. तसेच मुलाच्या पालनपोषणासाठी पैसे देणेही बंद केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
 
 
दरम्यान, घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झालेली नसतानाच सुधीरने दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याचा आरोप पत्नीने केला आहे. आपली फसवणूक झाल्याचे सांगत रेणू यांनी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५ आणि ८२(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.