वाशीम,
inferno-at-firecracker-warehouse-in-hingoli वाशीम जिल्ह्यापासून ५० कि.मी. अंतरावर असलेल्या हिंगोली शहरातील अत्यंत गजबलेल्या मारवाडी फटायाच्या गोदामाला सोमवारी रात्री उशिरा आग लागली. या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला तर १५ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नगर परिषद अग्नीशमन दल, पोलिस दल व आमदार संजय बांगर यांनी घटनास्थळी दाखल होवून परिस्थितीचा आढावा घेतला तसेच जखमींना उपचारार्थ दाखल केले. जखमीपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतकाच्या संख्येत वाढ होण्याची शयता आहे.
प्राप्त माहितीनुसार शहरातील मारवाडी गल्लीत बारसेटवार यांचे घर व फटायाचे गोदाम आहे. दिवाळीच्या तोंडावर त्यांनी मोठ्या प्रमाणात फटायाचा साठा करुन ठेवला होता. दरम्यान सोमवारी रात्री उशीरा या गोदामाला अचानक आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्ररुप धारण केले. या आगीत विजयकुमार रामकृष्ण बारसटवार वय ७५ रा. मारवाड गल्ली हिंगोली, अविनाश काशीनाथ बांगर वय २६ रा. वंजारवाडा हिंगोली हे दोघे होरपळून गंभीर जखमी झाले.
त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असतांना डॉटरांनी मृत घोषीत केले. घटनास्थळावरील फटायांच्या स्फोटामुळे एकच खळबळ उडून नागरिकांमध्ये एकच धावपळ सुरू झाली. आग कशामुळे लागली याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. एवढ्या दाट वस्तीत आणि गर्दीच्या भागात फटायाचा साठा कसा केला जातो याबाबत तर्कवितर्क लढविल्या जात आहेत. फटायाच्या गोदामाला आग लागल्याची माहिती शहरासह परिसरात वार्यासारखी पसरली. त्यावेळी आ. संजय बांगर, अग्नीशमन दल, पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल होवून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले.