शिकवणीला जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग

५० वर्षीय व्यक्तीने दिला त्रास; सोनेगाव पोलिसांत पॉक्सोअंतर्गत गुन्हा

    दिनांक :06-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
pocso case शाळा आणि शिकवणीसाठी ये-जा करणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देणे, अश्लील इशारे करणे तसेच आक्षेपार्ह भाषा वापरल्याच्या आरोपावरून ५० वर्षीय व्यक्तीविरुद्ध सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 

minor girl allegedly stalked on way to tuition, pocso case filed in nagpur 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल वानखेडे असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीच्या आजीने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, १५ वर्षीय नात शाळा व शिकवणीसाठी नियमित ये-जा करते. त्याच वस्तीत राहणारा हर्षल वानखेडे हा तिचा पाठलाग करीत असल्याचा आरोप आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीला अश्लील इशारे करून तसेच आक्षेपार्ह भाषा वापरून त्रास दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. १ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी ३ ऑक्टोबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीची दखल घेत सोनेगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५, ७८ आणि ७९ तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसून पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे.