कारंजा (घा.)
officer suspended शेतकर्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी, शासकीय कामकाजात दिरंगाई तसेच वरिष्ठ अधिकार्यांच्या आदेशांचे पालन न केल्याच्या आरोपांवरून कारंजा तालुयातील कृषी अधिकारी कार्यालयाचे उपकृषी अधिकारी मनोज तायडे यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध विभागीय शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
निलंबनाच्या कालावधीत मनोज तायडे यांचे मुख्यालय तालुका कृषी अधिकारी वरोरा, जि. चंद्रपूर यांच्या कार्यालयात राहणार आहे. तालुका कृषी अधिकार्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच, निलंबनाच्या कालावधीत कोणत्याही खासगी नोकरी अथवा व्यवसायात सहभागी होण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येऊ शकते.
तसेच, निलंबन काळातील निर्वाह भत्त्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. मनोज तायडे यांना निलंबनाच्या कालावधीत नियमानुसार निर्वाह भत्ता तसेच पूरक भत्ते देय राहणार आहेत.