विशाखापट्टणम
INS Surya भारतीय नौदलाची समुद्री ताकद वाढविण्यासोबतच देशाची स्वदेशी जहाजबांधणी क्षमता अधिक सक्षम करण्याच्या दिशेने मंगळवारी (६ ऑक्टोबर) महत्त्वाचे पाऊल पडले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विशाखापट्टणम येथील हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडमध्ये विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी देशातील पहिल्या स्वदेशी फ्लीट सपोर्ट शिप अर्थात एफएसएस-१चे ‘INS सूर्य’ या नावाने जलावतरण करण्यात आले. याशिवाय अद्ययावत स्लिपवे-४ आणि ३०० टन क्षमतेच्या ‘गोलियथ’ क्रेनचेही उद्घाटन करण्यात आले.
भारतीय नौदलाच्या दीर्घ पल्ल्याच्या मोहिमा अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी फ्लीट सपोर्ट शिपची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. हिंद महासागर क्षेत्रात दीर्घकाळ समुद्री कारवाया सुरू ठेवताना युद्धनौकांना सातत्याने इंधन, रसद, देखभाल आणि अन्य आवश्यक सहाय्याची गरज असते. ही गरज समुद्रातच पूर्ण करण्याची क्षमता अशा जहाजांमुळे नौदलाला मिळणार आहे. त्यामुळे नौदलाच्या सहनशक्तीबरोबरच त्याची कार्यक्षमता आणि दीर्घकाळ समुद्रात तैनात राहण्याची क्षमता वाढणार आहे.
‘INS सूर्य’ हे पूर्णपणे स्वदेशी पद्धतीने डिझाइन करण्यात आलेले जहाज आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्गो आणि इंधन साठविण्याची व्यवस्था असून, समुद्रातच आवश्यक दुरुस्ती व देखभाल करता यावी यासाठी ऑनबोर्ड वर्कशॉपची सुविधा आहे. तसेच मल्टी-रोल हेलिकॉप्टरच्या वापरासाठी डेक आणि जहाजाच्या सुरक्षेसाठी स्वसंरक्षण प्रणालीही त्यात आहे. त