प्रेमसंबंध, लग्न अन् नंतर बेघर; दोन अल्पवयीन मुलींची फसवणूक

सक्करदरा व वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना; गर्भवती झाल्यानंतर संपर्क तोडला

    दिनांक :06-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
minor girls deceived अल्पवयीन मुलींशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवणे, त्यानंतर लग्न करून काही दिवसांतच त्यांना सोडून देण्याच्या दोन घटना सक्करदरा आणि वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आल्या आहेत. एका प्रकरणात आरोपीने अल्पवयीन मुलीला अहमदाबाद येथे नेऊन तिच्याशी लग्न केले. त्यानंतर तिला एकटीला नागपुरात पाठवून संपर्क तोडल्याचा आरोप आहे. वैद्यकीय तपासणीत ही मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले.
 

minor girls deceived 
 
 
सक्करदरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील जांगडे याचे १५ वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधातून त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिला अहमदाबाद येथे नेण्यात आले. तेथे दोघांनी लग्न केल्याचे मुलीने तक्रारीत नमूद केले आहे. मात्र, काही दिवसांनंतर आरोपीने तिला एकटीला नागपुरात पाठविले. नागपुरात आल्यानंतर झालेल्या वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आरोपीने तिच्याशी संपर्क तोडल्याचा आरोप आहे. अखेर पीडितेने सक्करदरा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.
दुसरी घटना वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणातील पीडितेचे सध्याचे वय १८ वर्षे ८ महिने आहे. तिच्या तक्रारीनुसार, सुमारे दीड वर्षापूर्वी तोमेश विनायकसिंग गौतम (२५) याने तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. त्यावेळी ती अल्पवयीन असल्याची माहिती आरोपीला होती. असे असतानाही त्याने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. पीडिता १८ वर्षांची झाल्यानंतर आरोपीने तिच्याशी लग्न केले.minor girls deceived मात्र, लग्नाला काही दिवस होताच त्याने तिला सोडून दिले. तसेच तिला सोबत ठेवण्यास नकार दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यानंतर पीडितेने वाडी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. वाडी पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.