जिजाऊंच्या चरणी शेतकरी विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुबोध सावजी यांचे साकडे

    दिनांक :06-Oct-2026
Total Views |
सिंदखेडराजा
subodh-savji सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक राजवाड्यात माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी दि. ६ ऑक्टोबर रोजी भेट देऊन राजमाता मासाहेब जिजाऊ साहेब यांच्या चरणी अभिवादन केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य रयतेच्या हितासाठी राज्य शासनाला योग्य निर्णय घेण्याची सुबुद्धी मिळावी यासाठी मासाहेब जिजाऊंच्या चरणी साकडे घातले.
 
subodh
मासाहेब जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेच्या कल्याणाची शिकवण दिली. अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ, सर्वसामान्य जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य आणि शेतकरी-कष्टकरी जनतेचे संरक्षण हीच त्यांच्या विचारांची शिकवण होती. आज महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक विविध अडचणींना सामोरे जात असताना राज्यकर्त्यांनीही त्याच विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून श्रीमंतांसाठी नव्हे, तर रयतेच्या कल्याणासाठी शासन करावे अशी भावना सुबोध सावजी यांनी व्यक्त केली.
 
यावेळी गणेश राजे जाधव, डॉ.गोपाल बच्छिरे, गौतम खरात, छगन झोरे, अजय झोरे, सत्यजित खरात, अमित जाधव, तेजराव मस्के, शैलेश सावजी, रणजीत मरमट, उल्हास भुसारी, गणेश पादरे, प्रशांत जायभाय, गौतम जाधव, बाबासाहेब म्हस्के, जुबेर, भाऊराव जावळे महावीर सातपुते, नामदेव आनकर, गणेश इंगळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.