राजकीय वादावरून तलवारीने हल्ला एका नगरसेवकासह दोघांचा खून

    दिनांक :06-Oct-2026
Total Views |
देऊळगाव राजा
sword-attack कव्वालीच्या कार्यक्रमात मुलांच्या भांडणावरून दोन नगरसेवकांमध्ये वाद उद्भवला याचे पडसाद पोलीस ठाण्यासमोरच तलवारीने हल्ला झाल्याने एका नगरसेवकासह दोघांचा खून झाल्याची घटना दि. ५ ऑक्टोबर रोजी घडली.
 
murder
याबाबत प्राप्त माहितीनुसार आठवडी बाजार परिसरात कव्वालीच्या कार्यक्रमात लहान मुलांच्या भांडणावरून दोन नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला. या संदर्भात दोन्ही गट पोलीस स्टेशन च्या गेट जवळ समोरासमोर आले. यामध्ये दोन्ही गटाने एकमेकांवर हल्ला चढविला, यामध्ये तलवारी आणि चाकू ने एकमेकांवर वार केल्याने नगरसेवक शेख अनवर शेख अली उर्फ अन्नुमाया यांच्या डोयात आणि मानेवर तलवारीने हल्ला करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले तर आरिफ खान हारून खान पठाण याच्या पोटात चाकू ने वार झाल्याने तो पण गंभीर जखमी झाला. दोघा गंभीर जखमींना जालना येथे हलविण्यात आले मात्र तेथे उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. या राजकीय हल्ल्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे.