तलावातील पाण्याचा उपसा करणार्‍या मोटारी काढून घ्या

पंस प्रशासनाला निवेदन

    दिनांक :06-Oct-2026
Total Views |
मानोरा,
drains-the-water-from-the-pond आसोला खुर्द येथे गावात पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आसोला खुर्द व कारपा शिवारातील दोन्ही तलाव तसेच नाल्यावर बसविण्यात आलेले मोटार पंप तात्काळ काढून घेण्यात याव्या, अशी मागणी निकीता राठोड सरपंच व उपसरपंच बादल राठोड यांनी गट विकास अधिकारी, लघू पाटबंधारे विभाग यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
 

drains-the-water-from-the-pond
 
मानोरा तालुयात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, दुष्काळ परिस्थितीत पाणी टंचाई आसोला खुर्द येथे सध्या मोठ्या प्रमाणात भासत आहे. आसोला खुर्द येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ची पाणी पुरवठा योजना आहे. परंतु या योजनेचे मुबलक पाणी गावापर्यंत पोहचत नाही. तसेच पशुधनासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शयता आहे. तेव्हा आसोला खुर्द व कारपा येथील दोन्ही तलावामध्ये शिवारातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात मोटार पंप बसविले आहेत.
 
 
त्यापैकी अनेक पंप ७ ते १० हॉर्सपॉवर क्षमतेचे आहेत. सदर पंपांद्वारे मोठ्या प्रमाणात व सातत्याने पाण्याचा उपसा होत असल्यामुळे तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू राहिल्यास येत्या काळात गावातील नागरिकांसह जनावरांना पिण्यासाठी पाणी देखील उपलब्ध होणार नाही, अशी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शयता आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. तरी आपण या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आसोला खुर्द व कारपा शिवारातील दोन्ही तलाव तसेच संबंधित नाल्यावर बसविण्यात आलेले सर्व मोटार पंप तात्काळ बंद करावे, अशी मागणी सरपंच उपसरपंच यांनी केली आहे.