वाहतूक पोलिस ठरले ‘त्या’ महिलेसाठी देवदूत

    दिनांक :06-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
traffic police एक महिला सायकलने कामावर जात असताना यमरुपी आलेल्या ट्रकने तिला धडक दिली. ती सायकलसह ट्रकच्या खाली आली आणि ट्रक तिला फरफटत जात होता. तेवढ्यात वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याच्या लक्षात हा प्रकार आला. त्या कर्मचाऱ्याने ताबडतोब धाव घेत ट्रकखालून त्या महिलेला बाहेर काढले. ट्रकच्या चाकाखाली चिरडल्या जात असतानाच पांढऱ्या वर्दीतील देवदुताने तिचा जीव वाचवला. ही थरारक घटना शनिवारी दुपारी १ वाजता वीटाभट्टी चौकात घडली. छाया शंकरराव चौधरी (३०), रा. वांजरा, असे या महिलेचे नाव आहे. या अपघातात तिला किरकोळ दुखापत झाली असून तिची प्रकृती स्थिर आहे.
 


traffic police 
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छाया चौधरी हिला आई आणि दोन भाऊ आहेत. हलाकीची परिस्थिती असल्यामुळे ती गांधीबाग येथे एका कपड्याच्या दुकानात काम करते. नेहमीप्रमाणे सायकलने दुकानात जात होती. वीटाभट्टी चौकातून जात होती. दरम्यान, ट्रकचालक फिरोज अब्बास खान हा (एमएच-४०सी-डी-५४९४) हा ट्रक घेऊन चिखलीच्या दिशेने जात होता.traffic police दुपारी १ वाजताच्या सुमारास वीटाभट्टी चौकात ट्रकने छाया हिच्या सायकलला धडक दिली. ट्रकचालकाने ट्रक पुढे नेला. यावेळी ट्रकच्या मध्ये छायाची सायकल अडकली आणि ट्रकने ती फरफटत जात होती.यावेळी कळमना वाहतूक झोनच्या पोलिस निरीक्षक ललिता तोडासे आणि त्यांचे सहकारी पोलिस शिपाई नितीन पांचाळ, हवालदार सोनी काली आणि प्रदीप आसेकर हे चौकात कर्तव्यावर होते. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लगेच छाया यांच्या मदतीसाठी धाव घेतली. फरफटत जाणाऱ्या छायाला चाकाखालून बाहेर ओढले. वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे छाया यांचे प्राण वाचले.