नवी दिल्ली
vande bharat sleeper भारतीय रेल्वे लवकरच देशातील दुसèया वंदे भारत स्लीपर ट्रेनची घोषणा करण्याच्या तयारीत आहे. गुवाहाटी-हावडा मार्गावरील पहिल्या स्लीपर ट्रेनच्या यशानंतर आता देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि आयटी हब बंगळुरू या दोन महानगरांदरम्यान ही अतिवेगवान सेवा सुरू होत आहे. या महिन्याच्या अखेरीस या गाडीला हिरवा कंदील मिळण्याची दाट शक्यता आहे.
गेल्या तीन दशकांपासून प्रवासी मुंबई-बंगळुरू दरम्यान वेगवान रेल्वे सेवेची मागणी करत होते. सध्या धावणाèया उद्यान एक्सप्रेसला या प्रवासासाठी सुमारे 24 तास लागतात. मात्र, ही नवी वंदे भारत स्लीपर ट्रेन हे अंतर 16 तासांपेक्षा कमी वेळेत पार करेल.
आठवड्यातून सहा दिवस धावणाèया या गाडीमुळे प्रवाशांचे तब्बल आठ तास वाचतील. प्रस्तावित वेळापत्रकानुसार, ही गाडी बंगळुरूहून रात्री दहा वाजता सुटून दुसèया दिवशी दोन वाजताच्या सुमारास मुंबईत पोहोचेल. तर मुंबईहून रात्री साडे दहाला निघून दुसèया दिवशी दोन वाजताच्या सुमारास बंगळुरूत दाखल होईल. या प्रवासात गाडीला कल्याण, सोलापूर, कलबुर्गी, रायचूर, गुंतकल आणि अनंतपूर या स्थानकांवर थांबे असतील.
16 डब्यांच्या या गाडीत 11 थर्ड एसी, 4 सेकंड एसी आणि 1 फर्स्ट एसी कोचचा समावेश असेल. ही गाडी ताशी 160 किमी वेगाने धावण्यास सक्षम आहे.