१५ मिनिटे श्वास रोखून विद्युत जामवालची साधना

शरीर थरथरले, डोळ्यांत आले पाणी

    दिनांक :06-Oct-2026
Total Views |
मुंबई
vidyut jammwal जबरदस्त फिटनेस, मार्शल आर्ट्स आणि अनोख्या योगसाधनेसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता विद्युत जामवाल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईत आयोजित ‘स्ट्रीट फाइटर’च्या विशेष कार्यक्रमात विद्युतने केलेल्या एका अनोख्या योगप्रात्यक्षिकाने उपस्थितांना काही क्षणांसाठी आश्चर्यचकित केले. त्याने तब्बल १५ मिनिटे श्वास रोखून स्थिर राहण्याचा प्रयत्न केला. या काळात त्याच्या शरीराला कंप सुटला आणि डोळ्यांतून पाणी येऊ लागल्याने उपस्थितांमध्ये चिंता निर्माण झाली. मात्र, विद्युतने आपली साधना पूर्ण केली.
 

vidyut jammwal holds breath for 15 minutes at street fighter event, fans shocked 
‘स्ट्रीट फाइटर’मध्ये विद्युत प्रसिद्ध गेमिंग व्यक्तिरेखा धलसिमची भूमिका साकारत आहे. या पात्राचे चित्रण योग आणि आध्यात्मिक साधनेशी जोडलेले आहे. त्यामुळे आपल्या प्रत्यक्ष योगाभ्यासाचा आणि चित्रपटातील व्यक्तिरेखेचा संबंध दाखवण्यासाठी त्याने कार्यक्रमात हे विशेष प्रात्यक्षिक केले.
प्रात्यक्षिकानंतर विद्युतने यामागील तंत्राबाबत माहिती दिली. पतंजली योगसूत्राशी संबंधित एका विशेष तंत्राचा वापर आपण या साधनेसाठी केल्याचे त्याने सांगितले. अशा प्रकारच्या साधनेमुळे आयुष्यातील अनेक महत्त्वाचे टप्पे गाठण्यास मदत झाल्याचा दावा त्याने केला. हे तंत्र आपण तरुणांसोबतही यापूर्वी शेअर केले असल्याचे त्याने नमूद केले.योग हा केवळ शारीरिक तंदुरुस्ती मिळवण्याचा मार्ग नसून मानसिकदृष्ट्याही सक्षम बनवणारी साधना असल्याचे विद्युतने सांगितले. स्वतःवर नियंत्रण ठेवणे आणि स्थिर राहण्याची क्षमता ही आयुष्यात पुढे जाण्यासाठी महत्त्वाची असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
आजच्या धावपळीच्या vidyut jammwal जीवनात प्रत्येकजण काही ना काही मिळवण्याच्या शर्यतीत असल्याचे सांगत विद्युतने तरुणांना थांबण्याचाही संदेश दिला. प्रत्येक वेळी परिणामाच्या मागे धावण्याऐवजी काही काळ स्वतःला स्थिर ठेवणे आणि शांत राहणे आवश्यक आहे, असे त्याने म्हटले. आयुष्यात काही यश मिळवण्यामागे स्वतःला स्थिर ठेवण्याच्या प्रयत्नांचाही वाटा असल्याचे त्याने सांगितले. प्रत्येक क्षणी काहीतरी करण्याची गरज नसते; अनेकदा थांबणे आणि स्थिर राहणे हीदेखील महत्त्वाची कला आहे, असे विद्युतने स्पष्ट केले. ही क्षमता विकसित केल्यास आयुष्यात मोठा फायदा होऊ शकतो, असा त्याचा विश्वास आहे.
दरम्यान, ‘स्ट्रीट फाइटर’ हा विद्युत जामवालसाठी विशेष महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटातून तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून, त्यात तो धलसिमची भूमिका साकारत आहे. योग, मार्शल आर्ट्स आणि शारीरिक प्रशिक्षणाचा दीर्घ अनुभव या भूमिकेसाठी त्याला उपयुक्त ठरला आहे. ‘स्ट्रीट फाइटर’ येत्या १६ ऑक्टोबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असून, इंग्रजीसोबतच हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.