तलाव, नाल्यातून नियमबाह्य पाणी उपसा बंद करा

आमदार सई डहाके यांना देण्यात आले निवेदन

    दिनांक :07-Oct-2026
Total Views |
मानोरा,
mla-sai-dahake तालुयातील आसोला खुर्द येथे दोन्ही तलाव व नाल्याच्या पाण्याचा अनधिकृत व नियमबाह्य पाणी उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. हा पाणी उपसा तात्काळ रोखून पाणी नागरिक व जनावरांसाठी राखीव ठेवावे, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने आमदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
 
 
mla-sai-dahake
 
ग्रामपंचायत आसोला खुर्द यांनी शासनाच्या सूचनेनुसार गावात दवंडी देऊन नदी, नाले व जलसाठ्यामधून पाणी उपसा करणार्‍या शेतकर्‍यांना मोटार पंप काढून घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरूच आहे. केवळ ग्रापं स्तरावर कारवाई करणे शय नसल्याने तहसील प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनात माजी पंचायत समिती सदस्य दामोदर एल. भोयर व सरपंच निकीता राठोड ग्रामपंचायत आसोला खुर्द यांनी म्हटले आहे की -अनधिकृत पाणी उपसा होत असलेल्या ठिकाणी तात्काळ स्थळ पाहणी करून योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
 
 
कार्यकारी अभियंता, महावितरण यांना पत्र देऊन दोन्ही तलावावरील पाणी उपशासाठी असलेली विद्युत जोडणी तपासून ती तात्काळ बंद करण्याची कार्यवाही करावी. दोन्ही तलाव व नाल्यावरील मोटार पंप तात्काळ काढून घेण्यात यावेत, जेणेकरून उपलब्ध पाणीसाठा गावातील नागरिक व पशुधनासाठी सुरक्षित ठेवता येईल, असेही निवेदनात नमूद केले आहे.