आर्वी,
dr-abhilash-dharmathok सुप्रसिद्ध जनरल फिजिशियन तसेच इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सचिव, आर्वी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभिलाष धरमठोक यांना नुकताच टाइम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र टाइम्स यांच्या संयुत वतीने आयकॉन ऑफ हेल्थ केअर २०२६ हा अत्यंत सन्मानाचा पुरस्कार नागपूर येथील हॉटेल सेंटर पॉईंटच्या सभागृहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
डॉ. अरुण पावडे यांच्या मार्गदर्शनात काम करणारे डॉ. अभिलाष धरमठोक यांनी मागील १० वर्षांत वैद्यकीय व्यवसायासोबतच सामाजिक कार्यात एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. मागील १० वर्षांपासून आठवड्यातून एकदा संत लहानुजी महाराज संस्थान, टाकरखेड येथील धर्मार्थ दवाखान्यात रुग्णांना नि:शुल्क सेवा देत आहेत. सामान्य नागरिकांना वेळेवर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे तसेच गरजवंतांना मदतीचा हात देणे आणि कोणत्याही सामाजिक कार्याप्रसंगी धावून जाणे हा त्यांच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग झालेला आहे.
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल रेड क्रॉस सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अरुण पावडे, आमदार सुमित वानखेडे, नगराध्यक्ष स्वाती गुल्हाने, उपाध्यक्ष गौरव जाजू, मिर्झापूर नेरीचे सरपंच बाळा सोनटके, रेड क्रॉस सोसायटीचे पदाधिकारी, सदस्य, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार, तसेच मित्र परिवाराने अभिनंदन केले.