...तर खबरदार! नागरिकांना 25 हजारांपर्यंत दंड?

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोठी अपडेट

    दिनांक :07-Oct-2026
Total Views |

जालना,
Dry Droughtदुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जालना शहर महानगरपालिका प्रशासनाने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जालना शहरातील नागरिकांनी पाणी वायाला घालवल्यास आता 5 हजारापासून पासून तर 25 हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे आणि तसे आदेशही महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांनी काढले. घरगुती नळ जोडणी तोट्या आणि अंतर्गत जलवाहिनीला गळती असल्यास 15 ऑक्टोबर पर्यंत दुरुस्त करून घेण्याच्या सूचना आयुक्तानी दिल्या शिवाय पाणी भरल्यानंतर नळ तात्काळ बंद करावेत असंही आदेशात म्हटलंय,दरम्यान महानगरपालिकेच्या जलवाहिनीवरून पाणी खेचण्यासाठी विद्युत मोटार लावणे, रस्त्यावर वाहन धुणे,घरासमोरील रस्ता धुऊन काढणे अशा प्रकारचा पाण्याचा अपव्यय आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही प्रस्तावित करण्याचा इशाराही दिला आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

jalna
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील आन्वा महसूल मंडळात शेतकऱ्यांच्या दुष्काळी पिकांचे पंचनामे करण्याला वेग आला असून तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या पथकाकडून शेतकर्‍यांच्या बांधावर जात संयुक्त वाहने करण्यात येत आहे,तालुक्यातील रेणुकाई पिंपळगाव, पारध यासह आसपासच्या गावांमध्ये पंचनामे देखील झाले असून आता आता महसूल विभागाकडून इतर ठिकाणचे पंचनामे करण्यातही वेग आल्याचे चित्र पाहायला मिळते, जिल्ह्यात मागील दीड ते दोन महिन्यापासून पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची सोयाबीन कपाशी यासह इतर पिकं करपून गेल्याने दुष्काळ जाहीर झाल्यानंतर प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे आधी देण्यात आले होते.
जिल्ह्यात मागील दीड ते दोन महिन्यापासून पावसाने मोठी ओढ दिल्याने अनेक ठिकाणी सोयाबीन,कपाशी आणि इतर खरीप पिकांना मोठा फटका बसलाय,शेतातील पिकांची सद्यस्थिती,झालेल्या नुकसानीचे प्रमाण आणि दुष्काळामुळे निर्माण झालेली परिस्थिती याची संयुक्त पाहणी करून प्रशासनाकडून पंचनामे केले जात आहे