रात्रभर शोधमोहीम; अखेर विहिरीत सापडला शेतकर्‍याचा मृतदेह

पाय घसरून पडल्याचा अंदाज; पिंपळगावातील घटना

    दिनांक :07-Oct-2026
Total Views |
समुद्रपूर,
farmers-body-found-in-well तालुयातील गिरड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव येथील ६५ वर्षीय शेतकरी मारोती बोरेकार मंगळवार ६ रोजी शेतात गेल्यानंतर ते घरी परतलेच नव्हते. पोलिस, वनविभाग व ग्रामस्थांनी रात्रभर शोध घेतल्यानंतर अखेर बुधवार ७ रोजी सकाळी त्यांचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आला. पाणी पिण्यासाठी विहिरीवर गेले असता पाय घसरून ते विहिरीत पडले असावेत, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
 
 
farmers-body-found-in-well
 
मंगळवारी सकाळी ११ वाजता बोरेकार हे पत्नी इंदिरा यांच्यासोबत बैलबंडीने शेतात गेले होते. पत्नी कपाशीच्या पिकात निंदण करीत असताना ते पाणी पिण्यासाठी विहिरीकडे गेले असावेत. मात्र, बराच वेळ उलटूनही ते परत न आल्याने पत्नीने शेतात व परिसरात त्यांचा शोध घेतला. त्यानंतर ग्रामस्थांनाही माहिती देण्यात आली. पिंपळगाव परिसरात वाघिणीचा वावर असल्याने सुरुवातीला वन्यप्राण्याच्या हल्ल्याची शयताही व्यत करण्यात आली. माहिती मिळताच गिरड पोलिस आणि वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने रात्री सुमारे ११ वाजेपर्यंत परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली; मात्र बोरेकार यांचा ठावठिकाणा लागला नाही.
 
 
बुधवारी सकाळी पुन्हा शोध घेत असताना त्यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आला. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. पाणी पिताना पाय घसरल्याने ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज असून घटनेचा पुढील तपास गिरडचे ठाणेदार विकास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.