नय्यी नवेली’च्या दुनियेत ‘फटा पटाखा’चा जल्लोष

यामी गौतम धरचा हटके अंदाज; झॉम्बी डान्स पार्टीने वेधले लक्ष

    दिनांक :07-Oct-2026
Total Views |
मुंबई
nayyi naveli झी म्युझिक कंपनीने ऍमेझॉन MGM स्टुडिओज आणि कलर यलो यांच्या सहकार्याने आगामी ‘नय्यी नवेली’ चित्रपटातील दुसरे गाणे ‘फटा पटाखा’ प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. जी. व्ही. प्रकाश कुमार यांनी संगीतबद्ध आणि निर्मित केलेल्या या जोशपूर्ण डान्स ट्रॅकमध्ये यामी गौतम धरचा आगळावेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. वायू यांनी गीतलेखन केले असून मधुबंती बागची यांनी गाण्याला आवाज दिला आहे. विजय गांगुली यांनी त्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे.
 

fata patakha song from nayyi naveli released by zee music, starring yami gautam 
‘फटा पटाखा’मध्ये यामी गौतम धर एका अनपेक्षित झॉम्बी डान्स पार्टीच्या मध्यवर्ती भूमिकेत दिसते. दमदार बीट्स, लक्षात राहणारा हुक आणि भव्य नृत्यरचना यामुळे हे गाणे उठून दिसते. चित्रपटाच्या फँटसी विश्वाला या गाण्यामुळे मजेशीर आणि वेगळा संगीताचा रंग मिळाला आहे. विशेष म्हणजे, झॉम्बींना नेहमीप्रमाणे भयावह रूपात सादर न करता त्यांनाच या पार्टीची रंगत वाढविणारे पात्र म्हणून दाखविण्यात आले आहे.
उत्सवी वातावरण, ठेका धरायला भाग पाडणारी लय आणि नृत्यासाठी अनुकूल धून यामुळे ‘फटा पटाखा’ नवरात्रीच्या जल्लोषासाठीही विशेष आकर्षण ठरण्याची शक्यता आहे. फँटसी आणि झॉम्बी या दोन वेगळ्या संकल्पनांना उत्सवी नृत्याच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा प्रयत्न या गाण्यात करण्यात आला आहे.
गाण्याविषयी बोलताना nayyi naveli  जी. व्ही. प्रकाश कुमार यांनी सांगितले की, ‘फटा पटाखा’च्या माध्यमातून वेगळ्या संगीतविश्वाचा प्रयोग करण्याची संधी मिळाली. ‘नय्यी नवेली’च्या अनोख्या दुनियेतील उत्साह आणि वेगळेपणा श्रोत्यांपर्यंत पोहोचविणारे, ऐकताच सेलिब्रेशनची भावना निर्माण करणारे गाणे करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. दमदार हुक आणि दीर्घकाळ लक्षात राहणारी ऊर्जा गाण्यात असावी, अशी त्यांची अपेक्षा होती. वायू यांच्या शब्दांमुळे आणि मधुबंती बागची यांच्या आवाजामुळे गाण्याला खोडकर आणि बेधडक रंग मिळाला असून, यामीच्या परफॉर्मन्सने त्याची ऊर्जा आणखी वाढविल्याचे त्यांनी नमूद केले.
मधुबंती बागची यांनी ‘फटा पटाखा’ हे मस्ती, विनोद आणि प्रचंड ऊर्जेने भरलेले गाणे असल्याचे सांगितले. गाण्याचे रेकॉर्डिंग करताना त्याच्या भव्य आणि हाय-ऑक्टेन अंदाजामुळे विशेष आनंद मिळाल्याचे त्यांनी म्हटले. जी. व्ही. प्रकाश कुमार आणि वायू यांची सर्जनशील जोडी असल्याने हे त्यांच्या आतापर्यंतच्या रोमांचक गाण्यांपैकी एक ठरल्याचेही त्यांनी सांगितले. या गाण्यावर प्रेक्षक कशा पद्धतीने नृत्य करतील, याची उत्सुकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
बालाजी मोहन दिग्दर्शित ‘नय्यी नवेली’ची कथा हिमांशु शर्मा आणि दिव्य निधी शर्मा यांनी लिहिली आहे. यामी गौतम धरसोबत आदिनाथ एम. कोठारे, अनुराग ठाकूर, सुनीता राजवर, मीता वशिष्ठ, आदित्य कुलश्रेष्ठ, सुस्मिता मुखर्जी आणि प्रतीक पचौरी हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत. आनंद एल. राय आणि हिमांशु शर्मा यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, जी. व्ही. प्रकाश कुमार हे संगीतकार आणि संगीत निर्माते आहेत.
‘नय्यी नवेली’ दसऱ्याच्या मुहूर्तावर १६ ऑक्टोबर २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘फटा पटाखा’ हे गाणे झी म्युझिक कंपनीच्या माध्यमातून प्रमुख संगीत स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाले आहे.