मेसीच्या अखेरच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात भावुक निरोप

    दिनांक :07-Oct-2026
Total Views |
ब्युनस आयर्स
lionel messi अर्जेंटिनाची राजधानी ब्युनस आयर्स येथील मॉन्युमेंटल स्टेडियममध्ये मंगळवारी रात्री केवळ फुटबॉल सामना झाला नाही, तर एका महान आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा भावुक अध्याय संपला. तब्बल ८५ हजार प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये लियोनेल मेसीने अर्जेंटिनाच्या जर्सीत अखेरचा सामना खेळला. बेनिनविरुद्धच्या या सामन्यात अर्जेंटिनाने ३-० असा विजय मिळवत आपल्या महान ‘नंबर-१०’ला दिमाखदार निरोप दिला. ३९ वर्षीय मेसीने आपल्या अखेरच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पेनल्टीवर गोल करत कारकिर्दीतील १२६वा आंतरराष्ट्रीय गोल नोंदवला. याशिवाय आणखी दोन गोलमध्ये त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
 

lionel messi, messi farewell, argentina, argentina vs benin, football news, messi last match, messi goal, argentina football, monumental stadium, buenos aires, messi number 10, argentina national team, football legend, sports news, messi latest news 
सामना सुरू होण्यापूर्वीच मेसी भावुक झाला होता. अर्जेंटिनाचा संघ बसमधून समर्थकांच्या गर्दीतून स्टेडियमकडे जात असताना मेसी डोळ्यांतील अश्रू पुसताना दिसला. स्टेडियममध्ये पोहोचल्यानंतरही त्याच्या भावना लपून राहिल्या नाहीत. सामन्याच्या सुरुवातीपूर्वी पुन्हा एकदा तो भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
मेसी मैदानात आपल्या तीन मुलांसह दाखल झाला. पत्नी अँटोनेला रोकुझ्झो आणि आई व्हीआयपी बॉक्समधून त्याचा हा विशेष क्षण पाहत होत्या. मैदानाच्या मध्यभागी अर्जेंटिनाची भव्य जर्सी ठेवण्यात आली होती. त्यावर मेसीचा प्रसिद्ध १० क्रमांक आणि त्याच्या वर स्पॅनिश भाषेतील ‘ग्रेसियस’ म्हणजेच ‘धन्यवाद’ असे लिहिले होते. तब्बल ८५ हजार चाहत्यांनी टाळ्यांचा कडकडाट आणि घोषणांनी आपल्या लाडक्या खेळाडूचे स्वागत केले.
सामन्याच्या दहाव्या मिनिटाला मेसीच्या सन्मानार्थ स्टेडियममधील वातावरण काही क्षणांसाठी थांबले. प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्याला मानवंदना दिली. बार्सिलोना आणि पॅरिस सेंट-जर्मेनचा माजी स्टार मेसीनेही हा भावनिक क्षण मनापासून अनुभवला.
मैदानावर मात्र मेसीने आपला प्रभाव दाखविण्यासाठी फार वेळ घेतला नाही. त्याने निकोलस ओटामेंडीला अर्जेंटिनासाठी सुरुवातीचा गोल करण्याची संधी निर्माण करून दिली. त्यानंतर निको पाझने अर्जेंटिनाची आघाडी आणखी भक्कम केली. सामन्याच्या दुसऱ्या सत्रात ७१व्या मिनिटाला मेसी स्वतः पेनल्टी घेण्यासाठी पुढे आला आणि अचूक फटका मारत चेंडू गोलजाळ्यात पाठवला. या गोलमुळे त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना आणखी संस्मरणीय ठरला.
अंतिम शिट्टी वाजल्यानंतर lionel messi निरोप सोहळ्याला आणखी भावनिक रंग चढला. स्टेडियमच्या आकाशात आतषबाजी करण्यात आली. ड्रोनच्या माध्यमातून आकाशात मेसीची प्रतिमा आणि त्याची १० क्रमांकाची जर्सी साकारण्यात आली. मेसीच्या जन्मगाव रोसारियोमध्येही हेलिकॉप्टरच्या माध्यमातून त्याची विशाल जर्सी हवेत झळकवण्यात आली. अर्जेंटिनाच्या विविध भागांमध्ये चाहत्यांनी या ऐतिहासिक क्षणाचा उत्साह आणि भावुकता अनुभवली.