भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

    दिनांक :07-Oct-2026
Total Views |
मालेगाव,
road-accidentशहरातील गाडगेनगर परिसरात रस्ता ओलांडून पाण्याचे भांडे आणण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेला भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना ६ ऑटोबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास घडली. गंभीर जखमी अवस्थेत वृद्धेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉटरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले.
 
 
malee
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडगेनगर येथील प्रभाग क्रमांक १७ मध्ये राहणार्‍या शोभा उत्तम सोनुने यांचे घरातील बोअर बंद पडल्याने त्या अधूनमधून घरासमोरील रामदास अवचार यांच्या घरातून पाणी भरत होत्या. ६ ऑटोबर रोजी सायंकाळी त्या नेहमीप्रमाणे पाणी भरण्यासाठी रस्त्याच्या पलीकडे गेल्या होत्या. पाणी भरल्यानंतर ठेवलेले भांडे आणण्यासाठी जात असताना रस्त्यावर वाहतूक सुरू असल्याने त्या रस्त्याच्या कडेला थांबल्या होत्या.
 
 
 
दरम्यान, मेहकरकडून मालेगावच्या दिशेने भरधाव वेगाने येणार्‍या काळ्या रंगाच्या टीव्हीएस स्पोर्ट दुचाकी क्रमांक एमएच ३७ एजे ७०६८ च्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत शोभा सोनुने यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर त्या रस्त्याच्या कडेला काही अंतरापर्यंत फरफटत गेल्या. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने त्यांचा मुलगा उमेश सोनुने घटनास्थळी धावून गेला. त्यावेळी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. शोभा यांच्या डोयाच्या मागील बाजूस गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव होत होता, तसेच उजव्या हातालाही मार लागला होता. नागरिकांच्या मदतीने त्यांना रुग्णवाहिकेतून मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉटरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
 
 
 
या प्रकरणी मृतक शोभा सोनुने यांचा मुलगा उमेश उत्तम सोनुने वय ४३ वर्षे, राहणार गाडगेनगर, मालेगाव यांनी मालेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार राजेश खेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल किशोर चिंचोलकर पुढील तपास करीत आहेत.