भरधाव कारने पोलिसांना उडविण्याचा प्रयत्न

थोडक्यात बचावले दोन वाहतूक पोलिस

    दिनांक :07-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
speeding car driver रॉंग साईड कार चालविणाऱ्या चालकावर कारवाई करण्यासाठी दोन वाहतूक पोलिसांनी कार थांबविण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने कार न थांबवता थेट दोन्ही पोलिस हवालदारांच्या अंगावर घातली. दोन्ही कर्मचाऱ्यांनी वेळीच सतर्कता दाखविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यामुळे दोन्ही कर्मचारी थोडक्यात वाचले. त्यानंतर कारचालकाने पोलिसांना शिवीगाळ केली आणि कारवाई केल्यास वर्दी उतरविण्याची धमकी दिली. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. जय मेघराज बजाज (वय ३०, प्लॉट क्र. १४, कृष्णविहार सोसायटी, नरेंद्रनगर) असे आरोपी कारचालकाचे नाव आहे.
 

speeding car driver tries to run over two traffic police in nagpur, booked 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनेगाव वाहतूक परिमंडळात कार्यरत असलेले पोलिस हवालदार शंकर मुसळे आणि मनिष पलेरिया हे दोघे सोमवारी सायंकाळी उज्ज्वलनगर मेट्रो स्टेशनसमोर कारवाईसाठी गस्त घालत होते. यादरम्यान, मनिषनगर अंडरपास कडून आरोपी कारचालक जय बजाज हा रॉंग साईडने कार चालवत येत होता. दोन्ही पोलिसांनी चालकाला कार थांबविण्याचा इशारा केला. मात्र, जय बजाजने कार न थांबवता कार थेट दोन्ही पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. दोन्ही कर्मचाऱ्यांनी कारसमोरुन speeding car driver  उडी घेऊन स्वतःचा जीव वाचविला. पोलिसांनी सतर्कता दाखवली नसती तर दोन्ही पोलिसांचा जीव गेला असता. शेवटी पोलिसांनी त्याची कार थांबवून रॉंगसाईड चालान कारवाई केली. यादरम्यान, जय बजाने वाहतूक पोलिसांना शिवीगाळ केली. वर्दी ऊतरविण्याची धमकी दिली. पोलिसांनी कारचालकावर रितसर कारवाई केली असता जय बजाजने पोलिसांना धमकी दिली. त्यानंतर सोनेगाव वाहतूक परिमंडळाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत पांडे आणि पोलिस नियंत्रण कक्षाला घटनेबाबत माहिती देण्यात आली. या प्रकरणी हवालदार शंकर मुसळे यांच्या तक्रारीवरुन आरोपी कारचालक जय बजाजवर शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, धमकी देणे, शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.