सर्पदंशाने एसआरपीएफ जवानाचा मृत्यू

    दिनांक :07-Oct-2026
Total Views |
गडचिरोली,
srpf-jawan-dies-of-snakebite रेगडी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत कर्तव्यावर असलेल्या एसआरपीएफ जवानाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. राहुल प्रभाकर शिंगाडे (३५) असे मृत जवानाचे नाव असून ते एसआरपीएफ ग्रुप क्रमांक ६ मध्ये कार्यरत होते. ते मूळचे धुळे जिल्ह्यातील रहिवासी होते.
 
srpf-jawan-dies-of-snakebite
 
मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास शिंगाडे हे आंघोळीसाठी जात असताना त्यांना सर्पदंश झाला. त्यांना तातडीने चामोर्शी येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, गडचिरोली येथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
 
विशेष म्हणजे राहुल शिंगाडे हे स्वतः सर्पमित्र म्हणूनही कार्यरत असल्याची माहिती आहे. सापांबाबत माहिती असलेल्या जवानाचा सर्पदंशामुळेच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी पंचनामा व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आला.