शेतकरी आत्महत्या कुटुंबात उर्जा देऊन गेले ‘नाना’

वर्धेत तब्बल दोन दिवस मुक्काम, धाम नदी स्वच्छता अभियान

    दिनांक :08-Oct-2026
Total Views |
३०५ शेतकरी कुटुंबांना केले होती मदत
 
 
प्रफुल्ल व्यास
वर्धा,
dham-river-cleanup-drive चित्रपटांतून रांगडी भूमिका साकारलेला नट‘सम्राट’ वर्धेकरांनी तब्बल दोन दिवस अनुभवला... नाना पाटेकर २४ आणि २५ ऑक्टोबर २०१५ या दोन दिवस येथील नाट्य कलावंत हरिष इथापे यांच्या निवासस्थानी मुक्कामी होते. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना त्यांच्या नाम संस्थेने मदत दिली होती, येथील धाम नदी स्वच्छता अभियानही त्यांनी राबवले होते. आज पहाटे त्यांच्या निधनाचे वृत्त आले आणि नाना पाटेकरांच्या त्या स्मृतींना उजाळा मिळाला.
 
wardha
 
राज्यात शेतकरी आत्महत्याची सुरुवातच वर्धेतून झाली आहे. येथील दत्तापूर भागात देशातील पहिली शेतकरी आत्महत्या वर्धेला झाली. ती काळी नोंद वर्धेच्या माथ्यावर आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्तांची संख्याही वर्धेत मोठ्या प्रमाणात आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाना मदत करण्यासाठी नाना पाटेकर यांनी स्थापन केलेल्या ‘नाम’ या संस्थेचे कार्यालयाच इथापे यांच्या निवासस्थानी होते. २४ ऑक्टोबर २०१५ रोजी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना धनादेश वितरणाचा कार्यक्रम येथील अनेकान्त स्वाध्याय मंदिरात झाला. त्या कार्यक्रमात नाना पाटेकरांनी दिलेली भाषण आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एकल महिलांसाठी झालेले भाषण उर्जा देणारेच ठरले होते. आम्ही तुमची तहान पुर्णपणे भागवू शकत नाही. पण, ‘आभाळ फाटलं तरी हरायचं नाही,’ असा सल्ला त्यांना दिला होता.
 
  
यावेळी त्यांनी स्वत:चा अनुभवही कथन करताना आपल्या लहानपणी आलेले संकट आणि नववीत सुरू केलेल्या नोकरीनंतर भोवतालच्या लोकांनी केलेली मदत पैशात मोजता येत असल्याचे त्यांनी सांगितले होते. या कार्यक्रमात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या दोन्ही अभिनेत्यांनी जिल्ह्यातील ५०८ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटंुबातील सदस्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची आर्थिक मदत आणि साडी भेट दिली होते. येथे अभिनेता म्हणून आलो नाही. मदत छोटी आहे म्हणून रागाऊ नका, मदत उपकार नाही, अशी भावनीक साद घालत त्यांनी माझ्या बहिणींच्या डोक्यावर पाण्याचा हंडा दिसु नये म्हणू टँकरमुक्त गाव करण्याचा निर्धारही त्यांनी याच कार्यक्रमात व्यक्त केला होता. २५ ऑक्टोबर २०१५ ला नाम फाउंडेशनने वर्धा तालुक्यातील आमला गाव नानांच्या उपस्थितीत दत्तक घेतले. धाम नदी पुनःजीवन, महिलांना शिलाई मशीन वाटप, शेळी वाटप, कोविड काळात किराणा वाटप, नदी नाल्यांचे खोलीकरन, आमला गाव दत्तक, मुलींच्या शिक्षणाला मदत नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून वर्धेत राबवल्या गेले. नाना पाटेकरांच्या आठवणींना आज त्यांच्या जाण्याने वर्धेकरांनी उजाळा दिला.