नागपूर,
Ashwin Navratri मनीषनगर येथील आई तुळजाभवानी देवस्थानात अश्विन नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत भजन, गोंधळ आदी कार्यक्रम होणार आहेत.
१२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिर तसेच दिव्यांगांसाठी आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. यासोबतच आयुष्मान कार्ड, ई-श्रम कार्ड, पॅन कार्ड व बस पाससाठीही शिबिर आयोजित करण्यात आले आहे. १८ ऑक्टोबरला कन्याभोज, तर २१ ऑक्टोबरला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजक सचिन शर्मा यांनी नागरिकांनी उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
सौजन्य:देवराव प्रधान,संपर्क मित्र