नागपूर,
bsnl-fibre-migration-nagpurतुमचा बीएसएनएलचा लॅण्डलाईन फोन वारंवार बंद पडतो का? पाऊस आला की ब्रॉडबॅण्डची स्पीड गायब होते का, रस्त्याच्या कामामुळे केबल तुटल्याचे उत्तर मिळते का, तर आता ही कटकट कायमची संपणार आहे. भारत संचार निगम लिमिटेड नागपूर व्यावसायिक क्षेत्राने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शहरातील पारंपरिक, गंजलेली, चोरीला जाणारी कॉपर केबल प्रणाली पूर्णपणे बंद करून तिच्या जागी अत्याधुनिक हाय-स्पीड फायबर-टू-द-होम नेटवर्क आणण्याचे मेगा मायग्रेशन अभियान अधिकृतपणे सुरू करण्यात आले आहे.
याचा अर्थ आता खांबावरचे, जमिनीतले जुने तारांचे जाळे जाणार आणि त्याजागी काचेसारखी पारदर्शक फायबर येणार, जी प्रकाशाच्या वेगाने डेटा नेते. बीएसएनएलअंतर्गत परिपत्रकात स्पष्ट कारणे दिली आहेत, जी प्रत्येक नागपूरकराला पटणारी आहेत -
विकासकामांचा फटका : संपूर्ण नागपूर शहर हे सध्या कन्स्ट्रक्शन हब झाले आहे. विशेषतः झीरो माईल मेट्रो स्टेशन, अजनी, सीताबर्डी, वर्धा रोड परिसरात मेट्रो आणि अंडरपासच्या कामासाठी जेसीबीने खोदकाम सुरू असते आणि बीएसएनएलची ३० वर्षे जुनी भूमिगत कॉपर केबल तुटते. दर आठवड्याला १५-२० ठिकाणी फॉल्ट येतो.
कॉपर चोरीची टोळी सक्रिय : कॉपरला बाजारात किंमत असल्याने रात्रीच्या वेळी केबल चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. एका ठिकाणची केबल चोरी झाली की संपूर्ण वसाहतीचा फोन ८-१० दिवस बंद राहतो.
- दुरुस्ती अशक्य : जुने कॉपर नेटवर्क जोडणे, त्याला ज्वाॅईंट मारणे हे तात्पुरते काम आहे. पावसाळ्यात पाणी शिरले की आवाज घोगरा होतो, दोन एमबी डाटा कमी होतो. म्हणूनच बीएसएनएलने ठरविले की, डागडुजी नको, तर थेट मूळ पायाच बदला.
ग्राहकांसाठी पाच धमाकेदार फायदे
तुमचा ०७१२ वाला नंबर कायम तोच राहणार :
सगळ्यात मोठी भीती - नंबर बदलेल का? तर अजिबात नाही. तुमचा २० वर्षांपासूनचा लॅण्डलाईन नंबर, जसा आहे तसाच एफटीटीएचवर चालू राहील. कोणत्याही अडथळ्याशिवाय.
स्पीडचा सुपरफास्ट अनुभव
कॉपरवर जास्तीत जास्त ८ ते १० एमबीएस मिळायचा, तोही तुटक. फायबरवर ३० एमबीएस ते ३०० एमबीएसपर्यंत प्लॅन उपलब्ध. वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन क्लास, ४ के व्हिडीओ, एकाच वेळी ५ मोबाईलवर वायफाय सगळे उत्तम.
कोणाशी संपर्क साधायचा?
आपल्या भागातील बीएसएनएल एक्सचेंज - मुख्य एक्सचेंज, सिव्हिल लाईन्स, अजनी, काटोल रोड, महाल - येथे संपर्क साधा किंवा बीएसएनएलच्या कर्मचाऱ्याला थेट होकार द्या.