पोषण सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ‘व्हील्स ग्लोबल फाउंडेशन’शी सामंजस्य करार

    दिनांक :08-Oct-2026
Total Views |
गडचिरोली,
wheels-global-foundation जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील माता, अर्भक आणि लहान बालकांचे पोषण सुधारण्यासाठी तसेच कुपोषण प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन आणि व्हील्स ग्लोबल फाउंडेशन इंडिया यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार पुढील तीन वर्षांसाठी ‘मदर, इन्फंट अँड यंग चाइल्ड न्यूट्रिशन’ हा प्रशिक्षण व जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत आरोग्य कर्मचारी व अंगणवाडी सेविकांना पोषणविषयक समुपदेशन आणि प्रत्यक्ष कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
 
wheels-global-foundation
 
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि व्हील्स ग्लोबल फाउंडेशन इंडियाचे अध्यक्ष किशन गोएंका यांनी करारावर स्वाक्षर्‍या केल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण एम., जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी गावंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, बालविकास प्रकल्प अधिकारी दीपक बानाइत यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
 
स्तनपान व पोषणविषयक शास्त्रीय पद्धती दुर्गम भागातील मातांपर्यंत पोहोचविताना त्यांच्या मनात विश्‍वास निर्माण करणे ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीत आरोग्य कर्मचारी आणि अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची ठरेल, असे जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले. सुरुवातीच्या अडचणी दूर करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य व अंगणवाडी यंत्रणा ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला