नागपूर,
District-level swimming competition एनआयटी स्विमिंग पूल, अंबाझरी येथे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी शशिकांत कडंबे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना खेळामुळे शिस्त, आत्मविश्वास, एकाग्रता व सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो, असे सांगितले.
योगेश खोब्रागडे यांनीही जलतरणामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्यासोबतच नेतृत्वगुण, संयम व आत्मविश्वास वाढतो, असे सांगितले. खेळाडूंनी सातत्यपूर्ण सराव व मेहनतीच्या जोरावर ध्येय गाठावे, असे आवाहन करण्यात आले.उद्घाटनप्रसंगी नितीन मालवाडे यांच्या हस्ते शशिकांत कडंबे यांचा पुष्पगुच्छ व रोप देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जलतरण प्रशिक्षक, क्रीडा अधिकारी व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
सौजन्य:लालसिंग यादव,संपर्क मित्र