गोंदियाच्या धमदीटोल्यात गांजाची शेती उद्ध्वस्त

गांजाच्या रोपट्यांसह १.६२ लाखांचा गांजा जप्त

    दिनांक :08-Oct-2026
Total Views |
चिचगड पोलिसांची कारवाई
मुल्ला

gondia देवरी तालुक्यातील धमदीटोला येथे घराच्या परसबागेत गांजाची शेती करून विक्री करणार्‍या तस्करावर चिचगड पोलिसांनी धडक कारवाई करून त्याच्या ताब्यातून गांजाच्या रोपट्यांसह १ लाख ६२ हजार ७५० रुपयांचा ३.२५० किलो ग्रॅम गांजा जप्त केला आहे. हि कारवाई बुधवारी ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. आत्माराम माधो मडावी (५४) रा. धमदीटोला असे आरोपीचे नाव असून बुधवारी सायंकाळी त्यास अटक करण्यात आली आहे.
 

gondia cannabis farming busted in dhamditola, 3.25 kg ganja worth rs 1.62 lakh seized 
मिळालेल्या माहितीनुसार, धमदीटोला/मिसिपीरी येथे एका इसमाने आपल्या राहत्या घराच्या मागील परिसरात गांजाच्या रोपांची लागवड करून विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती चिचगड पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापामार कारवाई केली. कारवाईदरम्यान आरोपी आत्माराम मडावी याच्या राहत्या घराच्या परसबागेत अंमली पदार्थ गांजाच्या gondia लहान-मोठ्या १७ रोपट्यांची लागवड केलेली आढळून आली. पोलिसांनी सदर गांजाची रोपटे व त्यापासून मिळालेला गांजा असा एकूण ३.२५० किलो ग्रॅम मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी आत्माराम मडावीच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. चिचगड पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात अवैध गांजा लागवड करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक जनार्दन हेगडकर यांच्या मार्गदर्शनात चिचगड पोलिस पथकाने केली