आईच्या स्मृतीप्रित्यर्थ बुद्ध विहाराला फ्रीजर भेट

    दिनांक :08-Oct-2026
Total Views |
नागपूर
Janhit Yuva Foundation स्मृतिशेष कमलाबाई अण्णाजी गजभिये यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय गजभिये व जनहित युवा फाऊंडेशनचे कोषाध्यक्ष लक्ष्मीकांत गजभिये यांनी जगदिशनगर येथील प्रज्ञा बुद्ध विहार व वाचनालयाला फ्रीजर भेट दिला.

friz 
 
 
परिसरातील नागरिकांच्या गरजेच्या वेळी मृतदेह अंत्यसंस्कारापर्यंत सुरक्षित ठेवण्यासाठी या फ्रीजरचा उपयोग होणार आहे. आईच्या स्मृती समाजोपयोगी कार्यातून जपण्याचा गजभिये कुटुंबीयांचा हा उपक्रम असल्याचे जनहित युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवशंकर ताकतोडे यांनी सांगितले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
सौजन्य:शिवशंकर ताकतोडे,संपर्क मित्र