पारडीतील झुंडबळी : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

    दिनांक :08-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर
mob-killing-in-pardi पारडी परिसरात शेजारी राहणाऱ्या ९ वर्षीय चिमुरडीला खाऊचे आमिष दाखवून खोलीत नेऊन तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्यानंतर आरोपी नारायणदास मोहनदास वैष्णव (३५) याच्यावर नागरिकांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर पारडी पोलिसांनी ७ ते ८ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. ३ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची अटकेची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 
mob-killing-in-pardi
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ९ वर्षीय मुलगी घराबाहेर खेळत असताना नारायणदास वैष्णव या आरोपीने तिला जवळच असलेल्या आपल्या घरी नेले. तिथे त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. नंतर मुलीने आपल्या कुटुंबीयांना या घटनेबद्दल माहिती दिली. या गुन्ह्याची माहिती परिसरात पसरताच लोकांचा मोठा जमाव तिथे जमला आणि त्यांनी नारायणदासला मारहाण केली. तो मूळचा छत्तीसगड राज्यातील भिलाई शहराचा रहिवासी होता. मारहाणीत त्याला गंभीर दुखापत झाली होती; त्याला मेयो रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयात मृत्यू होण्यापूर्वी, त्याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा (पोक्सो) यांच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. पारडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुरावे गोळा केले. त्यानुसार तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची अटकेची प्रक्रिया सुरु होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.