भीषण आग; सात गॅस सिलिंडरचे स्फोट

    दिनांक :08-Oct-2026
Total Views |
मुंबई
mumbai fire, मुंबईतील मुलुंड पूर्वेकडील टाटा कॉलनी परिसरात असलेल्या लेबर कॅम्पला गुरुवारी भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. धारावीमधून विस्थापित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी उभारण्यात आलेल्या प्रकल्पाच्या परिसरात हा लेबर कॅम्प आहे. जी+१ स्वरूपाच्या या बांधकामात मोठ्या संख्येने कामगार वास्तव्यास होते. आगीचा भडका उडताच जीव वाचवण्यासाठी कामगारांनी कॅम्पमधून बाहेर धाव घेतल्याने परिसरात काही काळ प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
 

mumbai fire, mumbai mulund east fire: tata colony labor camp 
आगीची प्राथमिक कारणे अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. झोनल डीसीपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सात गॅस सिलिंडरचे स्फोट झाल्याची माहिती आहे. मात्र, आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास सुरू असून त्यानंतरच आगीचे निश्चित कारण स्पष्ट होणार आहे.
घटनेची माहिती मिळताच mumbai fire, अग्निशमन दलाच्या सुमारे १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्याचबरोबर रुग्णवाहिका, नवघर पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारीही तातडीने घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या पथकांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले. परिसरातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनीही आवश्यक सुरक्षा व्यवस्था केली.
दरम्यान, लेबर कॅम्पमध्ये उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याची माहिती झोनल डीसीपी यांनी दिली. आतापर्यंत या दुर्घटनेत कोणाचाही मृत्यू झाल्याचे किंवा कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे नेमके कारण, झालेल्या नुकसानीचे स्वरूप आणि घटनास्थळी घडलेल्या स्फोटांबाबत अधिक तपास सुरू आहे.