नागपूर
Municipal Corporation School एचसीएल फाउंडेशन व एसईडीटी संस्थेच्या सहकार्याने स्थापन करण्यात आलेल्या यंग कलाम डिस्कवरी सायन्स सेंटर आणि मनपा शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने मनपा शाळांतील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात विद्यार्थी विज्ञानाधारित प्रकल्प व अभिनव आविष्कार सादर करणार आहेत. गुलमोहर सभागृह, खामला येथे होणाऱ्या या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला व नवकल्पनांना प्रोत्साहन मिळणार आहे.प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना एचसीएल फाउंडेशनतर्फे ट्रॉफी व बक्षिसे दिली जाणार असून, डिसेंबरमध्ये त्यांना दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी नेण्यात येणार आहे. तसेच मनपातर्फे विजेत्या १० विद्यार्थ्यांना इस्रो भेटीची संधी मिळणार आहे.
सौजन्य:माधुरी पाडळकर,संपर्क मित्र