नानांनी पहाटे २.३० वाजता मित्राला पाठवला होता मॅसेज पण...

अखेरच्या काही तासांची धक्कादायक कहाणी

    दिनांक :08-Oct-2026
Total Views |
मुंबई,
Nana had sent a message to a friend ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. कार्डियाक अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. निधनाच्या काही तास आधी नाना पाटेकर यांनी आपल्या एका मित्राला संदेश पाठवून प्रकृती अस्वस्थ असल्याचे कळवले होते. मात्र, रात्रीची वेळ असल्याने हा संदेश मित्राला तत्काळ पाहता आला नाही. त्यानंतर पहाटे त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळाल्यानंतर मदतीसाठी धावपळ सुरू झाली. मात्र, रुग्णालयात पोहोचेपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली होती.मणिपाल रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर सालकर यांनी नाना पाटेकर यांच्या अखेरच्या काही तासांबाबत माध्यमांना माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांना पहाटे सुमारे ४ वाजून २० मिनिटांनी रुग्णालयात आणण्यात आले. त्यावेळी त्यांचा मृत्यू झालेला होता. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी सीपीआर देण्यासह आवश्यक वैद्यकीय प्रयत्न केले. मात्र, उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही. अखेर पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
 
 
 
Nana had sen
 
डॉ. शेखर सालकर यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे २ वाजून ३० मिनिटांनी नाना पाटेकर यांनी आपल्या एका मित्राला संदेश पाठवला होता. आपण अस्वस्थ असून शरीराच्या डाव्या बाजूला वेदना होत असल्याचे त्यांनी या संदेशातून कळवले होते. मात्र, रात्रीची वेळ असल्यामुळे मित्राला तो संदेश तत्काळ मिळाला नाही. सकाळी सुमारे ४ वाजता मित्र नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी पोहोचला. त्यावेळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि त्यांच्या अंगाला मोठ्या प्रमाणात घाम आला होता.यानंतर त्यांच्या केअरटेकरने रुग्णालयातून रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिका त्यांच्या निवासस्थानी पोहोचेपर्यंत नाना पाटेकर पूर्णपणे बेशुद्ध झाले होते. त्यांना घरातूनच सीपीआर देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सीपीआर देतच त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचेपर्यंत बराच उशीर झाला होता.
 
दरम्यान, रुग्णालयात आणले जात असताना त्यांचा मृत्यू झालेला असल्याचे डॉ. शेखर सालकर यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण त्यावेळी स्पष्ट झालेले नव्हते. त्यामुळे नियमांनुसार या प्रकरणाची मेडिको-लीगल केस म्हणजेच एमएलसी म्हणून नोंद करण्यात आली आहे. पोलिसांच्या उपस्थितीत नाना पाटेकर यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी गोवा मेडिकल कॉलेज अर्थात GMC येथे हलवण्यात आले आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आणि पोलिसांच्या तपासानंतर त्यांच्या मृत्यूबाबतची परिस्थिती अधिक स्पष्ट होणार आहे.नाना पाटेकर यांना यापूर्वी रुग्ण म्हणून मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले नव्हते, अशी माहितीही डॉ. सालकर यांनी दिली. त्यामुळे त्यांच्या पूर्वीच्या वैद्यकीय इतिहासाची माहिती रुग्णालयाकडे उपलब्ध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेची माहिती नाना पाटेकर यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांमध्ये आणि चित्रपटसृष्टीत मोठी हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनामागील नेमके वैद्यकीय कारण आणि परिस्थिती आता शवविच्छेदन अहवाल तसेच पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.