अन् आनंदवनाचा संवेदनशील आधार हरपला!

नाना आनंदवनाच्या प्रत्येकांला नावाने हाक देत

    दिनांक :08-Oct-2026
Total Views |
स्व. बाबा आणि साधनाताईंच्या स्मृतिस्थळाजवळ लावणार झाड
 
 
 
वरोडा,
nana patekar आपल्या दमदार अभिनयाने आणि जाड्याभरड्या आवाजाने प्रेक्षकांवर गेली अनेक दशके अधिराज्य गाजविणार्‍या नाना पाटेकर यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले आणि संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. सोबतच वरोडा येथील आनंदवन नानांच्या अशा अचानक जाण्याने हळहळले. कारण नानांचे आनंदवनाशी अत्यंत जिव्हाळ्याचे आणि भावनिक नाते होते.
 

nana patekar, nana patekar death, nana patekar news, anandwan, baba amte, sadhanatai amte, kaustubh amte, nana patekar tribute, nana patekar memories, anandwan news, marathi actor, marathi cinema, nana patekar legacy, chandrapur news, maharashtra news 
गुरवारच्या या धक्कादायक बातमीने एकाएकी 1978 ते 80 चा काळ एखाद्या चलचित्रपटाप्रमाणे आमटे कुटुंबीयांसह आनंदवनातील सर्वांनाच आठवला. नानांसोबत अविस्मरणीय क्षण घालविणार्‍या साक्षीदारांच्या डोळ्यापुढे तो अगदी तसाच उभा राहिला. त्यांचे डोळे पाणावले. श्रद्धेय बाबा आमटे आणि साधनाताई यांच्या सेवा कार्याची महती नानाच्या कानावर पडली आणि तरुण वयात 27 व्या वर्षी नाना आपली पत्नी नीलकांती पाटेकर आणि दिव्यांग मुलगा दुर्वास यांच्यासह आनंदवनात आले. त्यानंतर जवळपास दोन वर्षे दुर्वास हा आनंदवनातच राहिला.
नानांना येथील माणसांचा लढा लागला होता. बाबांच्या सेवाकार्याने ते आकर्षित झाले होते. आनंदवनातील तळे खोदणे, कुष्ठरोग्यांकरिता घर बांधणे आदी श्रमदानात आणि मित्रमेळाव्यात नानांची उपस्थिती आवर्जून असे. पुढे आनंदवनात राहून सेवा कार्य करण्याचा माणस त्यांनी बाबांना बोलून दाखविला. परंतु, नाना मधला कलावंत बघून बाबांनी त्यांना चित्रपट सृष्टीतच जाण्याचा सल्ला दिला. पुढे नाना नाटकात काम करू लागल्याचे बाबा सांगत असे.
नानांच्या आठवणी सांगताना आनंदवनाचे विश्वस्त कौस्तुभ आमटे म्हणाले की, नानांचे व्यक्तिमत्व पैलवानाच होते. बाबा आणि ताईंच्या कार्याने ते प्रभावित झाले होते. इथे धुलीवंदनासारख्या उत्सवात ते सहभागी होत आणि इथल्या दिव्यांगांना खांद्यावर घेऊन नाचत असत. नाना इथे आले की प्रत्येकाला नावाने हाक मारत. त्यामुळे नाना आपल्याला ओळखतात याचा अवर्णनीय आनंद कुष्ठरोगी आणि दिव्यांगांच्या चेहर्‍यावर उमटत असे. नानांचा मृत्यू चटका लावून गेल्याचे सांगत, श्रद्धेय बाबा आणि साधनाताईंच्या स्मृतिस्थळाच्या बाजूला वडाचे झाड लावून नानांची स्मृति जपणार असल्याचे कौस्तुभ आमटे म्हणाले.