नानांच्या निधनाने लहान भाऊ गमावला

प्रकाश आमटे यांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना

    दिनांक :08-Oct-2026
Total Views |
गडचिरोली,
nana-patekar ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने आमच्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी ही व्यक्तिगत हानी आहे. नानांनी बाबा आमटे यांना आपले वडीलच मानले होते. आमच्या कुटुंबाशी त्यांचे अतिशय घनिष्ठ आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. माझ्यासाठी नाना केवळ अभिनेते नव्हते, तर ते माझे लहान भाऊच होते, अशा शब्दांत प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी नाना पाटेकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.
 
 
nana-patekar
 
डॉ. आमटे म्हणाले की, माझा बायोपिक तयार होत असताना नाना तब्बल एक महिना हेमलकसात राहिले होते. या काळात ते आमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये अगदी सहज मिसळून गेले होते. माझ्या सुना आणि नातवंडांसोबत ते खेळायचे. स्वयंपाकघरात जाऊन त्यांच्यासाठी भाजी करायचे आणि स्वतःच्या हाताने त्यांना खाऊ घालायचे. त्यामुळे आमच्यातील नाते अतिशय जिव्हाळ्याचे होते. नानांच्या जाण्याने आमच्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. ते गेल्याचा अजूनही विश्वास बसत नाही, असे सांगत डॉ. प्रकाश आमटे यांनी नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.