७९ विहिरीच्या निरीक्षणातून धक्कादायक चित्र
वाशीम,
washim-district जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने भूजल पातळीत चिंताजनक घट झाली आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या (जीएसडीए) अहवालानुसार, मागील पाच वर्षांतील ऑटोबर महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सप्टेंबर २०२६ अखेर जिल्ह्याची भूजल पातळी सरासरी १.११ मीटरने खालावली आहे. जिल्ह्यातील सहाही तालुयांत पाणीपातळी खोल गेल्याने रब्बी हंगामासह आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शयता आहे.
जिल्ह्यातील ७९ निरीक्षण विहिरींमधील नोंदींच्या आधारे ही स्थिती स्पष्ट झाली आहे. मागील पाच वर्षांतील ऑटोबर महिन्यातील सरासरी पाणीपातळी ०.९७ मीटर होती. यंदा सप्टेंबरअखेर ही पातळी २.०८ मीटरपर्यंत खाली गेली आहे. गतवर्षी ऑटोबरमध्ये पाणीपातळी १.४१ मीटर होती. भूजल पातळीतील सर्वाधिक घट कारंजा तालुयात नोंदली गेली आहे. येथे २.०७ मीटरने पाणी खोल गेले आहे. त्यापाठोपाठ मंगरुळनाथरमध्ये १.३६ मीटर, मानोर्यात १.१५ मीटर, मालेगावात ०.८१ मीटर, रिसोडमध्ये ०.७० मीटर आणि वाशीम तालुयात ०.५८ मीटरची घट झाली आहे.
पावसाळ्यानंतरही भूजल पातळीत झालेली ही मोठी घसरण रब्बी पिकांच्या सिंचनासाठी आणि उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी धोयाची घंटा मानली जात आहे. शेतकर्यांनी उपलब्ध पाण्याचा वापर सूक्ष्म सिंचनाद्वारे (ठिबक व तुषार) करावा तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. ऑटोबर महिन्यात तालुकानिहाय विहिरीचे निरीक्षण केले असता मालेगाव तालुका ८ विहिरी ०.५९ मीटर, कारंजा तालुका १६ विहिरी १.१३ मीटर, मानोरा तालुका १५ विहिरी १.२२ मीटर, मंगरूळनाथ तालुका ११ विहिरी १.१३ मीटर, वाशीम तालुका ११ विहिरी ०.९५ मीटर, रिसोड तालुका १८ विहिरी ०.८० मीटर पाणी पातळी तर जिल्ह्यातील एकूण ७९ विहिरीचे निरिक्षण केले असता पाणी पातळी ०.९७ एवढी आहे.
तालुकानिहाय भूजल पातळीतील घट
कारंजा : २.०७ मीटर, मंगरूळनाथ : १.३६ मीटर, मानोरा : १.१५ मीटर, मालेगाव : ०.८१
मीटर, रिसोड : ०.७० मीटर, वाशीम तालुका ०.५८ मीटर. गतवर्षी ऑटोबर महिन्यात जिल्ह्यातील ७९ निरीक्षण विहिरींतील भूजल पातळीची पडताळणी भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्थेकडून करण्यात आली. (जीएसडीए) त्यावेळी जिल्ह्याची सरासरी भूजल पातळी १.४१ मीटर नोंदविण्यात आली होती.