नागपूर,
State-Level Poets' Gatheringमाणुसकी सामाजिक फाउंडेशन, निफाडतर्फे आयोजित राज्यस्तरीय कवी संमेलनात साहित्यिक व सामाजिक विश्लेषक **प्रवीण बागडे** यांनी ‘माणुसकी’ कविता सादर केली.जात-धर्माच्या भिंती, वाढता स्वार्थ आणि नात्यांमधील दुरावा यावर भाष्य करत त्यांनी **समता, बंधुता, करुणा आणि मानवतेचा संदेश** दिला. ‘माणुसकीच्या दिव्यानेच जीवन सारे उजळवू’ या विचारातून प्रेम व संवेदनशीलता जपण्याचे आवाहन त्यांनी केले.
संमेलनात महाराष्ट्राच्या विविध भागांतील कवींनी सामाजिक विषयांवरील कविता सादर केल्या. सहभागी कवींचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. फाउंडेशनचे संस्थापक सागर निकाळे यांनी प्रास्ताविक व आभार मानले.
सौजन्य:प्रवीण बागडे,संपर्क मित्र