घटस्थापनेसाठी ११ ते साडेबारा दरम्यान सर्वोत्तम मुहूर्त

ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांची माहिती - दसऱ्याचा विजय मुहूर्त केवळ ४६ मिनिटांचा

    दिनांक :09-Oct-2026
Total Views |


नागपूर

ghatasthapana शारदीय नवरात्राला रविवार, ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत असून, घटस्थापनेसाठी सकाळी ११ ते दुपारी १२.३० वाजता दरम्यानचा सर्वोत्तम मुहूर्त आहे. तसेच सकाळी ६.३० ते ११ या वेळेतही घटस्थापना करता येईल, अशी माहिती ज्योतिषाचार्य डॉ. अनिल नागेश वैद्य यांनी दिली.

 
ghatstapana
नवरात्रात घटस्थापना, अखंडदीप प्रज्वलन, दुर्गासप्तशती पाठ, नवचंडी होम-हवन आणि अष्टमी किंवा नवमीला कुमारिका पूजन करण्याची परंपरा अनेक कुटुंबांत आहे. प्रत्येकाने आपल्या कुळाचारानुसार देवीची उपासना करावी, असे डॉ. वैद्य यांनी सांगितले. यंदा घटस्थापनेच्या दिवशी दुपारी १२.३० नंतर मातामह श्राद्ध करता येईल. १५ ऑक्टोबरला पंचमी, १८ ऑक्टोबरला भानुसप्तमी, तर १९ ऑक्टोबरला दुर्गाष्टमी आहे. मंगळवार, २० ऑक्टोबरला महानवमी आणि विजयादशमी अर्थात दसरा साजरा होणार आहे. दसऱ्याचा विजय मुहूर्त दुपारी २.०२ ते २.४८ असा केवळ ४६ मिनिटांचा आहे. नवरात्रात देवी कवच, दुर्गास्तोत्र, देवीस्तुती आणि श्रीसूक्ताचे पठण करावे, असा सल्लाही डॉ. वैद्य यांनी दिला.