वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

कल्याणकारी महामंडळ लागू करण्याची मागणी

    दिनांक :09-Oct-2026
Total Views |
बुलडाणा, 
buldhana-newspaper-vendors-protestमहाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने शासनाने वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी मंजुर केलेल्या स्वतंत्र कल्याणकारी मंडळ तत्काळ कार्यान्वित करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन केले त्या अनुषंगाने दि. ९ ऑटोबर रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर बुलडाणा जिल्हा वृत्तपत्र संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला.
 
 
tbha
 
यावेळी वृत्तपत्र संघटनेचे जिल्हाभरातून आलेले शेकडो वृत्तपत्र विक्रेते सहभागी झाले होते यावेळी संघटनेच्या वतीने विविध घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौक या ठिकाणाहून सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी संघटनेच्या वतीने प्रमुख पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले.
 
 
ऊन, वारा,पाऊस व थंडी याची बाराही महिने तमा न बाळगता नागरिकांना सकाळ च्या वेळी घरपोच वृत्तपत्र पोहोचून, जगभरातील माहितीसह शासनाच्या योजना विषयी जागरूकता निर्माण करण्याचे महान कार्य वृत्तपत्र विक्रेते करतात. त्या वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या ’वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळाची’ लवकरात लवकर प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, या मुख्य मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या संदर्भातील एक मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी दिले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना गेल्या १६ ते १७ वर्षांपासून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि कल्याणकारी महामंडळासाठी सातत्याने संघर्ष करत आहे.
 
 
दीर्घकाळ चाललेल्या या लढ्यानंतर मंत्रिमंडळात (कॅबिनेट) या महामंडळाच्या स्थापनेचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कॅबिनेटने मंजुरी देऊनही अद्यापपर्यंत या महामंडळाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. विक्रेता कल्याणकारी महामंडळ’ तातडीने कार्यान्वित करून विक्रेत्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या आंदोलनात आयोजित बुलडाणा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र टिकार, जिल्हा उपाध्यक्ष संजय स्वामी, जिल्हा सचिव गजानन सरकटे, जिल्हा कोषाध्यक्ष माधव देशमुख, विभागीय सचिव प्रकाश उन्हाळे, तसेच कार्यकारी सदस्य विशाल एडसकर प्रसिद्ध प्रमुख संतोष गाडेकर,सचिन निमकर्डे ,राजू सपकाळ रवींद्र कुर्‍हाडे तसेच जिल्हातील वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.