अकोला,
modified-350-silencer शहरातील रस्त्यांवरून फटाक्यांसारखा कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांविरोधात शहर वाहतूक पोलिसांच्या तीन महिन्यांच्या मोहिमेत बुलेटचा मूळ सायलेन्सर काढून टाकण्याची कारवाई पोलिसांकडून करण्यात आली.या कारवाईत जप्त केलेल्या तब्बल ३५० मॉडीफाय सायलेन्सर शुक्रवार, ९ रोजी बुलडोझर चालवून
नष्ट करण्यात आले.
मॉडीफाय सायलेन्सर च्या कर्णकर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांना देखील प्रचंड त्रास होत आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा वाहनधारकांची संख्या वाढली आहे.त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वात शहरातील विविध भागांत धडक मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत सायलेंसर नष्ट केले असले तरी भविष्यात हा प्रकार घडू नये याकरिता जे व्यावसायिक मॉडीफाय सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट विक्री करीत असतील त्यांच्यावर कारवाईचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी यावेळी माध्यमांशी बोलतांना दिला.