वर्धा,
drought-fodder-transport-banजिल्ह्यातील ७ तालुक्यामध्ये दुष्काळी स्थिती घोषीत करण्यात आली आहे. या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये जिल्ह्यात उपलब्ध असलेला चार इतर जिल्ह्यात अथवा राज्याबाहेर मोठ्या प्रमणावर वाहतूक व विक्री झाल्यास स्थानिक पातळीवर चारा उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वान्मथी सी यांनी जिल्ह्यातील पशुचारा इतर जिल्ह्यात तसेच इतर राज्यात विक्री व वाहतुकास प्रतिबंध आदेश जारी केले आहेत.

आदेशानुसार जिल्ह्याच्या महसूल हद्दीतून इतर कोणत्याही जिल्ह्यात अथवा राज्याबाहेर सुक्या व ओल्या चार्यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक, विक्री किंवा जिल्ह्याबाहेर पाठविणे सक्त मनाई आहे. यामध्ये हिरवा चारा, कडबा, पेंढा, कुट्टी, मुरघास व पशुधनासाठी वापरला जाणारा तत्सम चारा, पशुखाद्य यांचा समावेश आहे. शासकीय योजना, शासकीय चारा डेपो, पशुसंवर्धन विभागाची अधिकृत व्यवस्था, आपत्कालीन पशुधन बचाव, पुनर्वसन, तसेच जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय यांची लेखी परवानगी दिलेल्या वाहतुकीस हा प्रतिबंध लागू राहणार नाही. अशा वाहतुकीस संबंधित अधिकृत परवाना, परवानगीपत्र सोबत ठेवणे बंधनकारक राहील.
जिल्ह्यातील उपलब्ध चारा प्रथम स्थानिक पशुधनाच्या गरजा भागविण्यासाठी उपलब्ध ठेवण्यात यावा. व्यापारी, उत्पादक, साठवणूकदार व वाहतूकदार यांनी स्थानिक चारा उपलब्धतेवर विपरीत परिणाम होईल अशा पद्धतीने साठवणूक, विक्री किंवा वाहतूक करू नये. पोलिस, महसूल, पशुसंवर्धन, कृषी विभाग व संबंधित स्थानिक प्राधिकरणांनी त्यांच्या अधिकारक्षेत्रात चारा वाहतूक करणार्या वाहनांची तपासणी करावी. संशयास्पद, प्रतिबंधित वाहतूक आढळल्यास वाहन, चार्याचे प्रमाण, मूळ ठिकाण, गंतव्य ठिकाण, वाहतूकदार व परवानगीपत्र यांची नोंद करून नियमानुसार पुढील कारवाई करावी, असे आदेशात नमूद आहे.
जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक करणे आवश्यकता असल्यास संबंधित व्यक्ती, संस्थांनी कारणे नमूद करून जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय यांच्याकडे पुर्वपरवानगीसाठी अर्ज करावा, परवानगी देताना जिल्ह्यातील उपलब्ध चारा, पशुधन संख्या व स्थानिक गरज यांचा विचार करण्यात येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
या आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन करणार्या व्यक्तीविरुद्ध लागू कायद्यांनुसार कारवाई करण्यात येईल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत दिलेल्या निर्देशाचे पालन न केल्यास तसेच जिल्हादंडाधिकार्यांच्या वैध आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्यात येऊ शकते, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.