चार राज्यांच्या पोटनिवडणुकीत NDA वरचढ!

    दिनांक :09-Oct-2026
Total Views |
Four State Bypoll Resultsदेशातील चार महत्त्वाच्या राज्यांत पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल हाती आले असून, भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली आहे. विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला आणि विशेषतः काँग्रेस पक्षाला या पोटनिवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. आसाममधील नागाव मतदारसंघात भाजपचे देवाशिष शर्मा यांनी 1,81,017 मते मिळवत AIUDF चे अध्यक्ष बदरुद्दीन अजमल यांच्यावर तब्बल 75,000 पेक्षा जास्त मतांची दणदणीत आघाडी घेतली.
  
 
mpwinning
अजमल यांना 1,05,769 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार शिबामणी बोरा अवघ्या 29,826 मतांसह तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. तसेच पश्चिम बंगालमधील नंदीग्राम आणि रेजीनगर या दोन्ही जागांवर भाजप उमेदवारांनी अनुक्रमे हसीरानी रथ आणि सखरव सरकार यांनी आघाडी मजबूत करत काँग्रेसला मागे टाकले आहे.
 
केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमधील थट्टांचावडी विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी ऑल इंडिया एन. आर. काँग्रेस (AINRC) पक्षाने विजय मिळवला आहे. AINRC चे अधिकृत उमेदवार अशोक आनंद यांनी काँग्रेसच्या ई. विनायगम यांचा 8,400 हून अधिक मतांच्या फरकाने दणदणीत पराभव केला. या पराभवामुळे पुदुच्चेरीत आपली सत्ता आणि राजकीय जनाधार परत मिळवण्याच्या काँग्रेसच्या आशांना मोठा सुरुंग लागला असून, सत्ताधारी पक्षाने आपले वर्चस्व कायम राखले आहे.