नाना पाटेकरांच्या मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट!

गोवा पोलिसांकडून "अनैसर्गिक मृत्यू"ची नोंद

    दिनांक :09-Oct-2026
Total Views |
पणजी
nana patekar हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू व ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या अकाली निधनाने संपूर्ण देश आणि कलाविश्व शोकाकुल झाले आहे. गुरुवारी, ८ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा पुण्यातील डोणजे गावातील त्यांच्या 'नानाची वाडी' या फार्महाऊसवर त्यांच्यावर अंतिम संस्कार पार पडले. नानांचे सुपुत्र मल्हार पाटेकर यांनी अत्यंत जड अंतःकरणाने आणि धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार विधी पार पाडले. नाना पाटेकर यांच्या अचानक निधनानंतर सगळ्यांनाच धक्का बसला. आता त्यांच्या मृत्यू प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे.
 

nana
नाना पाटेकर यांच्या मृत्यूने अनेकांना धक्का बसला. कार्डिएक अरेस्टने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, गोवा पोलिसांनी या प्रकरणात अचानक एक मोठे पाऊल उचलल्याने त्यांच्या मृत्यूच्या परिस्थितीबाबत चर्चांना उधाण आले आहे.
दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर आता त्यांच्या मृत्यूशी संबंधित कायदेशीर प्रक्रिया चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. गोवा पोलिसांनी या प्रकरणात 'अननैचुरल डेथ' म्हणजेच अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस रेकॉर्डनुसार, नाना पाटेकर यांना गोव्यातील डोना पाऊला येथील त्यांच्या घरातून रुग्णालयात आणले गेले होते, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मात्र, 'अनैसर्गिक मृत्यू'चा गुन्हा दाखल झाला म्हणजे त्यामागे कोणतीही कारस्थान किंवा कट-कारस्थान सिद्ध झाले आहे असे नाही.
कलम १९४ अंतर्गत तपास
समोर आलेल्या वृत्तानुसार, पणजी पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) च्या कलम १९४ अंतर्गत या प्रकरणाची नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस सब-इन्स्पेक्टर नितीन नाईक करत आहेत. पोलीस रेकॉर्डनुसार, नाना पाटेकर यांना डोना पाऊला येथील 'ओशन पार्क' या त्यांच्या निवासावरून बांबोळी येथील मणिपाल रुग्णालयाच्या कॅज्युअल्टी वॉर्डमध्ये आणले गेले होते, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. आता पोलीस त्यांच्या मृत्यूची वेळ, परिस्थिती आणि कारणांचा सखोल शोध घेत आहेत.
डॉक्टरांचे ४५ मिनिटांपर्यंत शर्थीचे प्रयत्न
नाना पाटेकर यांचे ८ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.२० वाजण्याच्या सुमारास निधन झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील घरी असताना त्यांच्या छातीत अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या होत्या. त्यानंतर तातडीने वैद्यकीय पथकाला पाचारण करण्यात आले. अभिनेते घरीच बेशुद्ध अवस्थेत आढळले होते आणि त्यांना वाचवण्यासाठी 'सीपीआर' (CPR) देखील देण्यात आला. त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मणिपाल रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही आणि सकाळी सुमारे ५:२० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. डॉक्टरांनी सुरुवातीला 'कार्डियाक अरेस्ट'ची (हृदयविकाराचा झटका) शक्यता वर्तवली होती, तर मृत्यूच्या नेमक्या परिस्थितीची पुष्टी करण्यासाठी शवविच्छेदन (Post-Mortem) करण्यात आले.