सुकळी शेत शिवारात हार्वेस्टरचा अपघात जीवितहानी टळली

    दिनांक :09-Oct-2026
Total Views |
उंबर्डा बाजार,
loss-of-life-averted येथून जवळच असलेल्या ग्राम सुकळी शेत शिवारात ९ ऑटोबर रोजी सकाळच्या सुमारास हार्वेस्टरचा भीषण अपघात घडला. शेतामध्ये सोयाबीन काढणीसाठी जात असतांना अचानक हार्वेस्टर क्रमांक एमएच-३७- एएच ५९१७ मशीनवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ते शेताशेजारील खोल खड्ड्यात पलटी झाले. या अपघातात हार्वेस्टरचा चालक केबिनमध्ये अडकल्याने गंभीर जखमी झाला असून, त्याला गंभीर दुखापत होऊन हार्वेस्टरचे प्रचंड नुकसान झाले आहे.
 
 
loss-of-life-averted
 
सध्या उंबर्डा बाजार सह परिसरात खरीप हंगामातील सोयाबीन काढणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ऐन सणासुदीच्या काळात पावसाची शयता आणि मजुरांची टंचाई लक्षात घेता, शेतकर्‍यांनी शेतातील पिके लवकर घरी आणण्यासाठी शेतकरी हार्वेस्टर मशीनचा वापर सुरू केला जात असला तरी या यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. रस्त्यावर हार्वेस्टर भरधाव वेगात चालवले जात असतांना या वाहनावर आळा घालावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे. या अपघातात चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने, अपघात झाला त्या क्षणी शेतातील इतर मजूर मशीनच्या कापणी ब्लेडपासून सुरक्षित अंतरावर काम करत होते, ज्यामुळे एक मोठी जीवितहानी टळली आहे. शेतीमध्ये आधुनिक यंत्रांचा वापर वाढत असताना, अशा अवजड मशीन चालवताना आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन करणे आणि जमिनीचा अंदाज घेणे किती गरजेचे आहे, हे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे.