मानोरा,
response-to-the-arts-festival अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई संयुक्त शाखा मानोरा - मालेगाव, नटश्री बहुद्देशीय संस्था, स्त्री शक्ती बहुद्देशीय संस्था मानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने शाखेच्या वर्धापन दिना निमित्त ६ ऑटोबर रोजी मानोरा येथे खुपसे सेलिब्रेशन हॉल मध्ये एक दिवसीय कलावंत मेळावा ,विविध कला महोत्सव आणि दोन अंकी विनोदी नाटक गिल्ली मिसळ या मराठी नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता.त्याला कलावंत, प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाला प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री श्वेता भामरे (मुंबई) यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते कलावंत मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय रोठे, नाट्य दिग्दर्शक राजेंद्रसिंह राजपूत, कार्याध्यक्ष प्रा. हेमंत देशमुख, उपाध्यक्ष योगेश देशमुख, कोषाध्यक्ष माणिक डेरे, डॉ.सुहास देशमुख, प्रमुख कार्यवाह यशवंत पद्मगिरवार आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन शाखेच्या कार्याची प्रशंसा केली. प्रास्ताविक यशवंत पद्मगिरवार यांनी केले.माणिक डेरे यांनी संचलन केले.किरण पद्मगिरवार यांनी आभार मानले.
यावेळी जगदीश जोशी,राजू ठाकरे,सुदाम तायडे, प्रभाकर भोयर, भोजराज खुपसे, आनंदा खुळे, मिलिंद मनवर,विजेता इंगोले,सुदेशना नावकार,ताई इसलकर, दीपक भगत, उल्हास साखरकर, पंडित राठोड, निलेश खुपसे यांची उपस्थिती होती त्या नंतर विविध कला महोत्सवा मध्ये अनेक कलावंतांनी सहभाग घेऊन आपली कला सादर केली. सहभागी कलावंताना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. रात्री ८ वाजता राजेंद्रसिंह राजपूत लिखित गिल्ली मिसळ या दोन अंकी नाटकाचा प्रयोग झाला.प्रयोगास मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला. नाट्य परिषद शाखेच्या सर्व पदाधिकारी, सभासद यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.