नवी दिल्ली,
Australia following the defeat दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघात मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पहिल्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाला त्यानंतर सलग दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. या मालिकेत ऑस्ट्रेलियाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकल्या नाहीत. कर्णधार पॅट कमिन्सला तब्बल ५० षटके गोलंदाजी करूनही एकही बळी मिळवता आला नाही. सलामीची जोडीही अपयशी ठरली, तर मार्नस लाबुशेनच्या खराब कामगिरीमुळे त्याचे संघातील स्थानही धोक्यात आले आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार पॅट कमिन्सने संघातील संभाव्य बदलांबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. जानेवारीच्या अखेरीस भारताविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंडविरुद्धही कसोटी मालिका खेळायची आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल. सलग दोन पराभवांनंतर संघात बदलांची चर्चा होणे स्वाभाविक असल्याचे कमिन्सने मान्य केले. ऑस्ट्रेलिया हा चांगला संघ असला तरी पुन्हा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवायचे असेल, तर खेळाच्या पद्धतीत आणि काही खेळाडूंमध्ये बदल करण्याची गरज भासू शकते, असेही त्याने स्पष्ट केले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पराभवाचा फटका ऑस्ट्रेलियाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतही बसला आहे. सलग दोन पराभवांमुळे ऑस्ट्रेलियाची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला ३२९ धावांत रोखल्यानंतर ऑस्ट्रेलियाने सामन्यावर पकड मिळवल्याचे कमिन्सला वाटले होते. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात करत उपाहारापर्यंत एकही गडी न गमावता १४० धावा केल्या आणि सामन्याचे चित्र बदलले. सध्याच्या गुणतालिकेत न्यूझीलंड पहिल्या, दक्षिण आफ्रिका दुसऱ्या, तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारत दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघ कोणते बदल करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.